नाशिक, 27 एप्रिल: राज्यातील कोरोनाची आकडेवारी चिंताजनक आहे. अशावेळी कोरोनाचे संक्रमण वाढू नये याकरता विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक या शहारांभोवती कोरोनाची विळखा अधिक आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन देखील लागू करण्यात आला आहे. या परिस्थितीत नाशिकमध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना रुग्णांना भेटायला येणाऱ्या नातेवाईकांची संख्या कमी करण्याबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे.
नाशिक महानगरपालिकेने असा निर्णय घेतला आहे की, नाशिकच्या कोव्हिड रुगणालयांमध्ये रुग्णांना भेटायला येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांवर गुन्हे दाखल केले जाणार आहे. अनेक कोव्हिड सेंटर असणाऱ्या रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी असते. यामुळे संक्रमणाचा धोका अधिक आहे. हे लक्षात घेताल पालिकेने हा निर्णय घेतला आहे.
नाशिकमध्ये कोव्हिड सेंटर असणाऱ्या रुग्णालयांमध्ये रुग्णांना जेवण देण्यासाठी त्याचप्रमाणे इतर कारणांसाठी नातेवाईक रुग्णांना भेटतात, हेच नातेवाईक शहरात सुपर स्प्रेडर म्हणून काम करत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. अर्थात या नातेवाईकांना देखील कोरोनाची लागण होते आणि त्यामुळे शहरात कोरोनाचे संक्रमण वाढते. किंवा हे नातेवाईक विषाणूसाठी कॅरिअर म्हणून काम करतात आणि त्यामुळे कोरोनाचे संक्रमण वाढते.
पालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या निर्देशानुसार, सुरुवातीला 1000 रुपयांचा दंड आकारला जाणार, दंड आकारल्यानंतरही नातेवाईकांनी रुग्णांना भेट देणे सुरूच ठेवले तर थेट गुन्हा दाखल केले जाणार आहेत. शहरात झाकीर हुसेन, बिटको रुग्णालय याठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे त्याठिकाणी रुग्णांना भेटण्यासाठी नातेवाईकांकडून गर्दी केली जाते, त्यातून संक्रमण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…