ताज्याघडामोडी

पुढचे चार दिवस महत्त्वाचे

मुंबई : एकीकडे उन्हाच्या झळा वाढत असताना आगामी चार दिवस म्हणजेच 29 एप्रिलपर्यंत मध्य भारतासह महाराष्ट्रात मेघगर्जना तसेच विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. यापूर्वी 11 एप्रिल रोजी राज्यात कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सातारा, परभणी या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडला होता. त्यानंतर आता पुन्हा आगामी 5 दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भ तसेच मराठवाड्यासह राज्याच्या इतर भागात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता आगामी चार दिवस म्हणजेच 29 एप्रिलपर्यंत अचानक हवामानात बदल होण्याची शक्यता वर्तविली जातेय. मध्य भारतासह महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येतोय. तसे हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितलं आहे.

कोल्हापूरला पावसाने झोडपले

पुढील चार दिवसांच्या पावसाची चाहूल आज राज्यात काही जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाली. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. जिल्ह्याच्या चंदगड, नेसरी भागात मुसळधार पाऊस पडला. यावेळी जोरदार पावसामुळे अनेक गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला होता.

ठाण्यात शहापूरमध्ये अवकाळी पाऊस

आज ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातसुद्धा काही ठिकाणी पासवाच्या सरी बरसल्या. शहारपूरमधील खर्डी भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. दरम्यान, आगामी चार दिवसांत राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. तसेच शेतमाल व्यवस्थित ठिकाणी ठेवण्याचेसुद्धा हवामान खात्याने सांगितले आहे

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

20 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

20 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago