पुणे -येता जाता टपल्या मारल्याच्या रागातून पैलवानाचा कुऱ्हाड आणि तलवारीने वार करून खून करण्यात आला. या गुन्ह्यातील अल्पवयीन चौघांसह सात जणांना भारती विद्यापीठ पोलिसांनी 48 तासांत ताब्यात घेतले. ही घटना बुधवारी रात्री गणराज चौकाजवळ घडली.
सचिन तानाजी वाघमारे (22), सोमनाथ दत्तात्रय गाडे (25, दोघे रा.आंबेगाव पठार), तुषार जालिंदर सरोदे (25, रा. कात्रज) अशी अटक आरोपींची नावे आहेत. संग्राम गुलाब लेकावळे (19) असे खून झालेल्याचे नाव आहे. मयत हा नियमित तालमीला जात असताना परिसरातील अल्पवयीन मुलांना नेहमी टपल्या मारत होता. पैलवान असल्याने संबंधित मुले त्याला घाबरत होती. यातूनच त्याचे यातील एकाबरोबर भांडण झाले होते.
याचा राग मनात ठेवून चौघा अल्पवयीनांनी त्यांच्या तीन सज्ञान साथीदारांबरोबर मिळून हा खून केला. तपासादरम्यान या गुन्ह्यातील अल्पवयीन चौघे पुणे रेल्वे स्थानकावरून बाहेरगावी पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीदरम्यान त्यांनी सचिन, सोमनाथ व तुषार यांच्या मदतीने गुन्हा केल्याचे सांगितले.
ही कारवाई तपास उपायुक्त सागर पाटील, सहायक आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगीता यादव, प्रकाश पासलकर, सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड, सचिन धामणे, उपनिरीक्षक नितीन शिंदे, अंमलदार रवींद्र भोसले, श्रीधर पाटील, संतोष भापकर, गणेश सुतार, प्रणव संकपाळ, सर्फराज देशमुख, सचिन पवार, आकाश फासगे, निलेश खोमणे, समीर बागशिरास, विजय कुंभारकर, शिवदत्त गायकवाड, जगदीश खेडकर, हर्षल शिंदे, अभिजित जाधव यांच्या पथकाने केली.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…