ताज्याघडामोडी

पुत्रवियोगाच्या धक्क्याने माता-पित्याने सोडले प्राण

कुटुंबातील सर्वात लाडक्या मुलाच्या अकाली मृत्यूचा धक्का बसल्याने आई-वडिलांनीही प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना संभाजीनगरात घडली आहे. या घटनेत दिवंगत प्राध्यापक डॉ. संजय नवले यांचे वडील माणिकराव व आई मंदाकिनी हे मृत्यू पावले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हिंदी विभागातील प्राध्यापक डॉ. संजय माणिकराव नवले (55) यांचे 15 मार्च रोजी उपचार सुरू असताना निधन झाले. मुळचे चोराखळी (ता. कळंब ) येथील ते रहिवाशी होते. त्यांच्यावर मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी उपस्थित असलेल्या आई-वडिलांचा रक्तदाब कमी झाल्याने पुण्यातील बोरा हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते.

उपचार सुरू असतानाच माणिकराव तात्याबा नवले ( माजी शिक्षण अधिकारी, वय – 80) यांचे शुक्रवारी सायकांळी पाच वाजता निधन झाले. तर दोन तासातच आई मंदाकिनी माणिकराव नवले (78) यांनीही प्राण सोडला. रक्तदाब कमी झाल्यानंतर उपचार सुरू असतानाच दोघांचीही प्राणज्योत मालवली. नवले दांपत्याच्या पश्चात प्रा.अरविंद (शिवाजी महाविद्यालय, उदगीर) व सुनील (पुणे) ही दोन मुले, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. या घटनेचे वृत्त समजताच चोराखळी गावावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, डॉ.संजय नवले यांच्या पाठोपाठ आई- वडिलांचेही निधन झाल्याची घटना अत्यंत वेदनादायक असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील आम्ही सर्वजण या दुःखात सहभागी आहोत, असे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी नवले कुटुंबियास पाठविलेल्या शोकसंदेशात म्हटले आहे

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

9 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago