मंगळवेढयात 25 बेडचे डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सुरु करण्यात येणार पालकमंत्री-दत्तात्रय भरणे
पंढरपूर, दि. २३: मंगळवेढा तालुक्यातील कोरोना बाधित गरीब व गरजू रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी शासकीय ग्रामीण रुग्णालयामध्ये 25 बेड सर्व सुविधायुक्त डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सुरु करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजनेबाबत तहसिल कार्यालय, मंगळवेढा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, नगराध्यक्षा अरुणा माळी, पंचायती समितीच्या सभापती प्रेरणा मासाळ, विठ्ठल सह.कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, प्रांताधिकारी उदसिंह भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, तहसिलदार स्वप्निल रावडे, गटविकास अधिकारी …चव्हाण, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.शिंदे यांच्यासह तालुक्यातील खाजगी रुग्णालयाचे डॉक्टर उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री भरणे म्हणाले, कोरोना रुग्णांची वाढ मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना दिसत आहे. कोरोना बाधितांना वेळेत उपचार मिळावेत त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयामध्ये 25 बेडचे हॉस्पिटल सुरु करण्यात येणार आहे . तसेच खाजगी रुग्णालयांनी डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल व डेडीकेटेड कोविड सेंटर सुरु करण्याबाबत प्रस्ताव दिल्यास त्यावर आवश्यकती तात्काळ कार्यवाही करावी. कोरोना बाधित रुग्णांना आरोग्य सुविधा देण्यास प्रशासन आवश्यक उपाययोजना करीत आहे.
तालुक्यातील होम आसोलेशनमधील रुग्णांचे प्रमाण कमी करुन त्यांना कोविड केअर सेंटर येथे ठेवण्यात यावे. यासाठी जादाचे कोविड केअरची सेंटर वाढविण्यासाठी कार्यवाही करावी. पोलीस प्रशासनाने संचारबंदीच्या कालावधीत विनाकारण रस्त्यावर नागरिक फिरणार नाही याची दक्षता घ्यावी. उल्लघंन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करावी अशा सूचनाही श्री भरणे यांनी यावेळी दिल्या.
यावेळी कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या व करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती प्रांताधिकारी भोसले यांनी यावेळी बैठकीत दिली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…