आज पंढरपूर येथे कोणाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालकमंत्री नामदार दत्तात्रय मामा भरणे यांनी मिटिंग आयोजित केली होती या यावेळी नगराध्यक्ष च्या वतीने माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले पक्षनेते गुरदास अभ्यंकर सामाजिक कार्यकर्ते अमोल डोके यांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिले सध्या संपुर्ण भारतासह महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असुन सोलापूर जिल्ह्यात देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.
पंढरपूर शहरातील नागरीकांची कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असुन सध्या अस्तित्वात असलेली आरोग्य सुविधा (कोव्हिड केअर सेंटर, हॉस्पिटल, दवाखाने) अपुरी पडत असुन त्यांच्यावर खुप ताण पडत आहे. यामध्ये ऑक्सिजन, रेमडीसिवीर इंजेक्शन हे देखील अपुरे पडत आहेत. त्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात येवुन मृत्युची प्रमाण वाढले आहे. पंढरपूर शहरातील नागरीकांना होणारा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नियंत्रित होण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या रुग्णालयांना रेमडीसिवीर व ऑक्सिजनचा पुरवठा मोठ्या प्रमाणात करण्यात यावा.
तसेच पंढरपूर शहराची लोकसंख्या 1 लाख असुन शासनाकडुन सात दिवसातुन फक्त 200 ते 300 कोव्हिड 19 च्या लसीचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नगरपरिषदेने स्थापन केलेल्या लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होवुन नागरीकांना लस न मिळाल्याने मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे. व दररोज लसीकरण केंद्रावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. तरी शहराची लोकसंख्या विचारात घेता व नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीमुळे वाढलेली रुग्णांची संख्या विचारात घेता दररोज 2000 कोव्हिडची लस नगरपरिषदेला मिळावी जेणेकरुन नागरीकांना लसीकरण करुन रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात आणता येईल अशी मागणी नगराध्यक्षा सौ साधनाताई भोसले यांनी केली आहे
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…