ताज्याघडामोडी

पंढरपूरला आणखी दोनशे बेड वाढवणार   पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय

पंढरपूरला आणखी दोनशे बेड वाढवणार  

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय

 

  पंढरपूर, दि. २३: कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी पंढरपूरला सुमारे दोनशे बेडची क्षमता वाढवण्याचा निर्णय  आज घेण्यात आला. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

पंढरपूर विश्रामगृह येथे झालेल्या या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, आमदार यशवंत माने, प्रशांत परिचारक, कल्याण काळे, भगिरथ भालके आदी उपस्थित होते.                                              पंढरपूर नगरपरिषदेच्या मालकीच्या इमारतीत शंभर बेडची क्षमता वाढविण्यात येणार आहे. यामध्ये सर्व सुविधा खासगी डॉक्टरांच्या माध्यमातून दिली जाणार आहे. त्याचबरोबर डीव्हीपी उद्योग समूह तर्फे अभिजीत पाटील यांचे पन्नास बेड, पडळकर हॉस्पिटलमध्ये तीस  आणि गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये तीस बेडची क्षमता वाढवली जाणार आहे.  

  पंढरपूरला सध्या पासष्ट एकर परिसरात आणि गजानन महाराज मठात कोविड केअर सेंटर स्थापन करण्यात आली आहेत. याचबरोबरीने मोठ्या ग्रामपंचायतींना मंजुरी दिली जावी, अशा सूचना पालकमंत्री भरणे यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिल्या.

  ब्रेक द चेनच्या मोहिमेत पोलीस विभागाने लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी करावी. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी, असे पालकमंत्री भरणे यांनी पोलीसांना सांगितले.    लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी काटेकोर नियोजन करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

  बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, उपजिल्हाधिकारी सचिन ढोले, पोलीस उपअधीक्षक विक्रम कदम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदिप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव, तहसीलदार सुशील बेल्हेकर, गटविकास अधिकार रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

16 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago