ताज्याघडामोडी

मृत रुग्णाच्या बँक खात्यातून पैसे गायब; बोटाचे ठसे वापरुन वॉर्ड बॉयने केली चोरी

जालना, 23 एप्रिल: सध्या राज्यात कोरोना विषाणूची स्थिती हाताबाहेर जात आहे. उपचाराअभावी अनेक रुग्णांचा मृत्यू होतं आहे. तर रुग्णांचे कुटुंबीय आपल्या रुग्णाला वाचवण्यासाठी हवे तेवढे पैसे मोजायला तयार होतं आहेत. अर्थातच याचा आर्थिक फटका रुग्णाच्या कुटुंबीयांना सहन करावा लागत आहे. अशी एकंदरित स्थिती असताना जालन्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका वॉर्ड बॉयने मयत रुग्णाच्या बोटांच्या ठशांचा वापर करून त्यांच्या बँकेतील रक्कम आपल्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केली आहे.

संबंधित घटना जालना कोविड जिल्हा रुग्णालयात घडली आहे. येथील एका वॉर्ड बॉयनं एका मयत कोरोना रुग्णाच्या बोटाचा ठसा वापरून ‘फोन पे’ वरून परस्पर पैसे लाटले आहेत. या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी वार्डबॉयला ताब्यात घेतलं आहे. संबंधित वार्डबॉयनं यापूर्वीही असे गुन्हे केले आहेत का? याचा तपासही पोलिसांकडून केला जात आहे.

जालना शहरातील इंदिरानगर येथील कचरू पिंपराळे असं संबंधित मृत रुग्णाच नाव आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची कोरोना चाचणी पोझिटिव्ह आल्यामुळे त्यांना जिल्हा कोविड रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यू झाल्यानंतर काही तासांनी कचरू पिंपराळे यांच्या खात्यातून काही पैसे विथड्रॉल झाल्याचं कुटुंबीयांच्या निदर्शनास आलं. बँक स्टेटमेंट आणि मोबाईल डिटेल चेक केलं असता कचरू पिंपराळे यांच्या मोबाईलमधून अंगठ्याचा ठसा वापरून फोनपे द्वारे 6800 रुपये ट्रान्सफर केल्याचं दिसून आलं आहे.

कचरू पिंपराळे यांचा मृत्यू तर पहाटे 6 च्या दरम्यान झाला होता, मग दुपारी दीड ते 2 च्या सुमारास पैसे कसे ट्रान्सफर झाले, हा प्रश्न कुटुंबीयांना पडला. दरम्यान मृत पिंपराळे यांचा मोबाईल फोन रुग्णालयामध्येच असल्याचं नातेवाईकांच्या लक्षात आलं. कोविड रुग्णालयातील वॉर्ड बॉय मोमीन मोसीन याने मयत कचरू पिंपराळे यांच्या अंगठ्याचा ठसा वापरून त्यांच्या खात्यातून फोनपेद्वारे 6800 रुपयांची रक्कम परस्पर ट्रान्सफर करून घेतल्याचे पुरावे कुटुंबीयांच्या हाती लागले. याशिवाय मृताजवळील 34 हजार रुपयांची रोख रक्कम आणि चांदीची अंगठीदेखील चोरी झाल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

16 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago