”पांडुरंग” ची ऑक्सिजन प्लान्ट उभारणीसाठी युद्धपातळीवर तयारी सुरु -आ.प्रशांत परिचारक

पंढरपूर शहरातील विविध डॉक्टरांची बैठक घेऊन आ.परिचारक यांनी घेतला आढावा 

राज्यासह सोलापूर जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सध्या ज्या गतीने वाढत चालली आहे ती गतवर्षीपेक्षा भयानक परिस्थिती निर्माण करण्याच्या दिशेने असून राज्यात अधिक त्रीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन बेडची नितांत गरज भासत आहे.केंद्र आणि राज्याकडून ओद्योगीक क्षेत्राला होणारा ऑक्सिजन पुरवठा जवळपास पूर्णपणे थांबविण्यात आला असला आणि हा ऑक्सिजन पुरवठा हॉस्पिटल्सकडे वळविण्यात आला असला तरी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची कमतरता भासत असून यामुळे राज्य सरकार जवळ जवळ हतबल ठरले आहे.अशावेळी सहकारी साखर कारखान्यांनी ऑक्सिजन प्लँट उभारावेत असे आवाहन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने करण्यात आले आहे.पण या पूर्वीच सोलापूर जिल्ह्यातील मेडिकल ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेऊन पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्यासाठी तयारी सुरु केली असून कारखान्याचे अधिकारी यासाठी आवश्यक असलेल्या सर्व त्या परवानग्या मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याशी संपर्क करून विविध परवाने प्राप्त करून घेत आहेत.देशातील ऑक्सिजन प्लँट उभारणी बाबत अनुभव असलेल्या विविध उद्योजकांशी सध्या चर्चा सुरु असून लवकरात लवकर श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्लँट कारखान्याच्या वतीने उभारणी करण्यासाठी युद्धपातळवीर प्रयत्न सुरु आहेत अशी माहिती आज कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांत परिचारक यांनी पंढरी वार्ताशी बोलताना दिली. 

          सोलापूरसह राज्यात सर्वत्र कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्यात उप्लब्धते अभावी मोठ्या अडचणी येत आहेत त्यामुळे अनेक रुग्णांना आपले जीवही गमवावे लागले आहेत.पंढरपुर शहरात अनेक हॉस्पिटल मध्ये बेड उपलब्ध होऊ शकतात पण ऑक्सिजन कुठून आणणार असा प्रश्न हॉस्पिटल चालकांकडून व्यक्त केला जात आहे.या गंभीर परिस्थितीची दखल घेत आ.प्रशांत परिचारक यांनी काही दिवसापूर्वी शहरातील विविध हॉस्पिटल चालक डॉक्टर सोबत बैठक घेऊन सद्य स्थितीला असलेला ऑक्सिजनचा पुरवठा आणि भविष्यातील संभाव्य परिस्थिती यांची माहिती जाणून घेतली.त्यानंतर पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून ऑक्सिजन निर्मिती प्लँट उभारणीसाठी तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली.सोलापूरचे जिल्हाधीकारी मिलिंद शंभरकर आणी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे अधिकारी यांच्यात एक बैठकही झाली आहे अशी माहिती आ.प्रशांत परिचारक यांनी पंढरी वार्ताशी दिली.     

 मेडिकल युजसाठी ऑक्सिजन पुरवण्यात सर्वात मोठा अडथळा ठरतो आहे तो सिलींडर उपलब्धतेचा,औषध प्रशासनासह विविध परवानग्याचा मात्र परवानगी मिळविण्यासाठी कारखान्याचे अधिकारी आणि जिल्हाधीकारी यांच्यात संर्पक आणि समन्वय आहे,लवकरच सर्व परवानग्या मिळतील मात्र सिलेंडर पुरवठादार कंपन्यांकडून होणारा विलंब लक्षात घेत थेट हॉस्पिटलला बल्क स्वरूपात ऑक्सिजन पुरवण्याबाबत चाचपणी करून पांडुरंग कारखान्याने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.जेव्हा कोरोना बाधितांसाठी ऑक्सिजन पुरवठ्यासाठीची फारशी गरज लागणार नाही तेव्हा हा पुरवठा औधोगिक क्षेत्राकडे वळविता येईल हे लक्षात घेत देशातील काही अनुभवी आणि ऑक्सिजन आयात-निर्यात क्षेत्रांशी संबंधित असलेल्या ऑक्सिजन प्लँट उभारणी व व्यवस्थापन यात अनुभवी असलेल्या कंपन्याशी संपर्क करण्यात येत असून लवकरात लवकर ‘पांडुरग’ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी सज्ज होईल असा विश्वास यावेळी आ.प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केला आहे.                   

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago

कर्मयोगीच्या तब्बल ११० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनी मध्ये निवड.

श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्‍या…

1 month ago