ताज्याघडामोडी

ऑक्स‍िजनचा पुरवठा सुरळीत ठेवा अप्पर जिल्हाधिकारी  संजीव जाधव यांच्या सूचना

ऑक्स‍िजनचा पुरवठा सुरळीत ठेवा

अप्पर जिल्हाधिकारी  संजीव जाधव यांच्या सूचना

पंढरपूर, दि. २२ :- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना बाधितांना  तात्काळ उपचार मिळावेत यासाठी शासकीय रुग्णालयासह खाजगी रुग्णांलयात डेडीकेटेड  कोविड हॉस्पिटल व डेडिकेटेड कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले  आहेत. या रुग्णालयांना ऑक्सिजनची कमतरता भासू यासाठी  वितराकांनी पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी अशा सूचना  अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी दिल्या

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाकडून करण्यात आलेल्या तसेच करावयाच्या उपाययोजनेबाबत शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस उपजिल्हाधिकारी सचिन ढोले, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अरविंद गिराम , आयएमएचे डॉ.पंकज गायकवाड तसेच ऑक्सिजन वितरक उपस्थित होते.

श्री. जाधव म्हणाले, ऑक्सिजन पुरवठा धारकांनी  ऑक्सिजन पुरवताना प्राधान्याने रुग्णालयांना पुरविण्यात यावा.रुग्णालयांनी ऑक्सिजनचा सुयोग्य वापर करावा अनावश्यक वापर व गळती होणार नाही याची दक्षता घ्यावी. कोरोना बाधित रुग्णांना वेळेवर बेड आणि ऑक्सिजन तसेच औषधे वेळेवर उपलब्ध होतील याची दक्षता आरोग्य विभागाने घ्यावी. रेमडेसिवर इंजेक्शनचा पुरवठ्याबाबत  जिल्हा प्रशासनाचे नियंत्रण असून , त्याचा गैरवापर होणार नाही याची दक्षता घ्यावी त्यासाठी संबधितांनी  वेळोवेळी तपासणी करावी अशा सूचनाही जाधव यांनी यावेळी दिल्या.

तालुक्यामधील शहरातील तसेच ग्रामीण भागातील विविध शाळा मठ ताब्यात घेवून कोविड केअर सेंटर उभारणीसाठी कार्यवाही करावी. कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता भविष्यातील नियोजनासाठी आरोग्य यंत्रणेने पेड कोविड सेंटरच्या प्रस्तावाबाबत वरीष्ठ अधिकाऱ्याशी चर्चा करुन आवश्यक निर्णय घ्यावा.  खाजगी रुग्णांलयानी कोविड केअर सेंटर  निर्मितीसाठी दिलेल्या रुग्णांलयाची आवश्यक तपासणी करुन प्रस्ताव सादर करावा तसेच शहरी व ग्रामीण भागातील  नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वार्डस्तरीय समिती व ग्रामस्तरीय समितीने  कार्यरत राहून जनजागृती करावी, असे उपजिल्हाधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले. तसेच तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ऑक्सिजन पुरवठा व औषधसाठा मुबलक प्रमाणात मिळावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीच्या वतीने वेदांत व व्हिडीओकॉन भक्त निवासामध्ये 200 बेड प्रशासनास मोफत उपलब्ध करुन देण्यात आले असल्याची माहिती मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी एकनाथ बोधले व वैद्यकीय अधिक्षक डॉ. अरविंद गिराम यांनी कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी करण्यात आलेल्या तसेच आरोग्य विभागमार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनेची  माहिती दिली .

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 hour ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago