रोपळे तालुका पंढरपूर येथील विश्वंभर सोपान कदम वय-57 वर्षे,धंदा-शेती व दुध डेअरी या चालकाने गावातील नितीन रघुनाथ कदम यास गावातून दूध संकलन करून डेअरीस देण्यासाठी दिलेल्या कमिशन पोटीच्या ऍडव्हान्सचे ४३ हजार पाचशे रुपये वारंवार चारचौघात मागतो म्हणून डेअरी चालक विश्वंभर कदम यास शिवीगाळ करत तु नेहमी चारचौघात मला पैसे मागुन माझी बेईज्जत करतो,माझी लोकांमध्ये आब्रु खातो,तुझे कसले पैसे मला माहीत नाहीत,थांब तुला जिवंतच ठेवत नाही.असे म्हणत दुधाचे फँट बघण्यासाठी असलेले अँसिडचे कँन्ड आणुन डेअरी चालकास खुर्चीवर दाबुन धरुन जिवे मारण्याच्या उद्देशाचे सदर अँसिडच्या कँन्डचे तोंड डेअरी चालकाच्या तोंडात घालुन जबरदस्ती अँसिड पाजले अशा आशयाची फिर्याद पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणी दाखल फिर्यादी नुसार,पंढरपूर तालुक्यातील रोपळे येतील विश्वभंर कदम हे सह्याद्री डेअरी बारामती यांच्याशी भागीरदारीत रोपळे येथे डेअरी व्यवसाय करतात.भावकीतीलच नितीन रघुनाथ कदम हा गावातील शेतक-यांकडुन दुध गोळा करुन गोळा केलेले दूध या डेअरीस देत असे.फिर्यादीने सदर नितीन कदम यास दूध गोळा कारणेसाठीच्या ऍडव्हान्स पोटी ६५ हजार इतकी उचल दिली होती.त्या पैकी २१ हजार ५०० रुपये कमिशन पोटी वजा करता राहिलेले ४३ हजार ५०० रुपये फिर्यादी हे नितीन कदम याकडे वारंवार व चारचौघात मागणी करीत होते.या वादातूनच हा हल्ला करण्यात आला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात आरोपी नितीन कदम याच्या विरोधात भादंवि ३०७,४५२,५०४,५०६ नुसार फिर्याद दाखल करण्यात आली आहे.