राज्यातील रोज वाढणारी कोरोना बाधितांची संख्या,ऑक्सिजन अभावी तडफडून मरत असलेले रुग्ण,रेमिडिसीवीर चा तुडवडा आणि केंद्राचे असहकार्य यामुळे राज्यातील परिस्थिती आता हाताबाहेर चालली असल्याचे दिसून येत असुन गेल्या वर्षभरापासून अतिशय धैर्याने परिस्थिती हाताळणारे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आता केंद्राला आर्त विनवणी केली असून तुमच्या पाया पडतो,हात जोडतो पण कबूल केल्याप्रमाणे २६ हजार रेमिडीसीवर इंजेक्शन तातडीने द्या अशी मागणी केली आहे.
राज्यांना पुरवठा करण्यात येणाऱ्या ऑक्सिजन,रेमिडिसीवीर आणि लसींचे नियंत्रण अजूनही पूर्णपणे केंद्राच्या हातात आहे.आम्ही वारंवार केंद्राकडे पाठपुरावा करीत आहोत.राज्यातील भीषण परिस्थितीची जाणीव करून देत आहोत पण केंद्राकडून याला फारसा प्रतिसाद मिळत नाहीय.गेल्या अनेक दिवसापासून आम्ही केंद्राकडे ६० हजार रेमिडिसीवीर ची मागणी करीत आहोत,त्यापैकी केवळ २६ हजार इंजेक्शन देण्याची तयारी केंद्राने दाखविली.तेही वेळेवर मिळत नाहीत.वास्तविक पाहता राज्यातील गंभीर रुग्णाची संख्या लक्षात घेता ६० हजार रेमिडिसीवीर तातडीने मिळणे गरजेचे असल्याचे राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…