ताज्याघडामोडी

रुग्ण दगावल्याने नातेवाईकांंकडून डॉक्टरांना मारहाण करत रुग्णालयाची तोडफोड

पुण्यातील कोंढवा परिसरातील प्राईम हॉस्पिटलमध्ये आणलेला रुग्ण दगावल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण करत रुग्णालयाची तोडफोड केली. मंगळवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. कोंढवा पोलिस ठाण्यात या प्रकरणी पंधरा ते वीस जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी डॉक्टर सिद्धांत उदयकुमार तोतला (वय 25) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास प्राईम हॉस्पिटलमध्ये रुग्णवाहिकेतून एका रुग्णाला आणले होते. डॉक्टरांनी या रुग्णाची तपासणी करत तो मयत असल्याचे त्याच्या नातेवाइकांना सांगितले.

त्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी डॉक्टर सिद्धांत यांना लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली. इतकेच नाही तर आरोपीने रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर आणि सिक्युरिटी केबिनवर दगडफेक करत तोडफोड केली.

दरम्यान रात्री उशिरा कोंढवा पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. डॉक्टर तोतला यांनी केलेल्या तक्रारीनंतर पंधरा ते वीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

25 minutes ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago