नालासोपारा, 20 एप्रिल : कोरोनाच्या महामारीत रेमडेसीवीरची मागणी वाढल्याने त्याचा काळाबाजार करून रुग्णांच्या नातेवाईकांची पिळवणूक करून लुटारू सक्रीय झाले होते. नालासोपारा येथील महिलेने दिलेल्या माहितीमुळे रेमडेसीवीरचा काळाबाजार उजेडात आला आहे. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून एका त्रिकुटाला अटक करून 3 इंजेक्शन व 3 मोटारसायकल जप्त केल्या आहेत.
गेल्या तीन दिवसांपूर्वी धानीव बाग येथील महिलेचे पती कोरोनाबाधित झाल्याने ते नालासोपारा येथील विनायका रुगणालयात दाखल झाले होते. तेथील डॉक्टरांनी तिला रेमडेसीवीर इंजेक्शन आणायला सांगितले. तिने सर्व दुकाने फिरून सुद्धा कुठेच सापडले नाही तिने बाजारात चौकशी केली. परंतु, तिला कुठेच मिळाले नाही मग तिला अज्ञात इसमाकडून सामिउल्ला फारुख शेख याचा नंबर मिळाला त्याला संपर्क केला असता त्याने ‘मी संध्याकाळी आणून देतो’ असे सांगितले. मात्र, तो आला नाही. त्याने तिला मीरा रोड येथे बोलावले आणि एका इंजेक्शनचे 35000 रुपये सांगितले. त्यामुळे व्यथित झाल्याने त्या महिलेने ही लूट थांबवण्यासाठी तिने मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाचे आयुक्त सदानंद दाते यांना कळवले, त्यांनी तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांना ही माहिती दिली.
लगेच अतिरिक्त पोलीस आयुक्त एस जयकुमार, पोलीस उपायुक्त प्रशांत वाघुंडे,सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पलांडे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कोकाटे अनिल शिंदे मोरे आनंद मोरे,उमेश वरठा, राकेश शिरसाट,सुखराम गडाख, शशिकांत पोटे,विनायक राउत,ट्विंकल कदम, योगेश नागरे,शेखर पवार याचं पथक बनवले.
ज्या महिलेने पोलिसांनी माहिती दिली ती महिला पुन्हा येण्यास तयार नव्हती. अर्चना नलावडे ही बोगस गिऱ्हाईक बनली तिने त्या नंबरवर संपर्क करून ‘माझी आई खूप आजारी आहे तिला रेमडेसीवीर इंजेक्शन ची गरज आहे’. फोन करून विनवणी करीत होती अक्षरशः फोनवर रडली तेव्हा त्याने मीरा रोड येथील नयानगर बॅक रोड येथे बोलावले आणि 2 तास तिथे बसवून ठेवले तिथून जवळ असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये एक दोन मेडिकल दुकानात घेवून इकडे तिकडे फिरवत राहिला त्याला बघायचे होते की, खरंच या महिलेला गरज आहे का? की आमच्यावर सापळा लावला अशी शंका असल्याने त्यांनी त्यादिवशी इंजेक्शन दिले नाही.
नलावडे यांनी त्यांचा रडलेला चेहरा बघून आरोपींची खात्री पटली असावी म्हणून दुसऱ्या दिवशी तिच्या नंबरवर फोन करून ‘तुमचे इंजेक्शन मिळाले आहे ते घेवून जा’ पण त्यासाठी 35 हजार लागतील मात्र नलावडे यांनी रडून रडून मला अजून 4 इंजेक्शन लागणार आहेत अजून बऱ्याच लोकांना पाहिजे आहेत अस सांगून 13500 रुपयात सौदा पक्का केला आणि दुसऱ्या दिवशी त्याने त्यांच्या नंबरवर फोन करून मीरा रोड येथे बोलावले.
मग त्या समिउल्ला च्या मोटारसायकल वर बसून एक दोन हॉस्पिटलजवळ घेवून गेला. पोलीस त्याच्या पाठोपाठ साध्या वेशात मागे पुढे फिरत होते. शेवटी समिउल्ला हा त्याचा साथीदार महम्मद तरबेज शेख व मोहम्मद इर्शाद अब्दुल हनांनी हे दोघे ही मोटारसायकल वरून आले. एका ठिकाणी उभे राहून रेमविन कंपनीचे 3950 किंमतीचे रेमडीसीवीर इंजेक्शन 13500 रुपये देवून घेतले त्यानंतर आधीच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी 3 जणांच्या मुसक्या आवळून एक इंजेक्शन ताब्यात घेवून त्यांची झडती घेतली असता अजून 2 इंजेक्शन सापडले असून त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या 3 मोटारसायकली तुळींज पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…