मुंबई, 20 एप्रिल : कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीचं संकट समोर उभं ठाकलेलं असतानाच आता सरकारसमोर आणखी एका संकटानं डोकं वर काढलं आहे. ते म्हणजे राज्यातील तुरुंगांमध्ये असलेल्या रुग्णांना होणारा कोरोना संसर्ग. राज्यातील अनेक कारागृहांमध्ये कोरोनाचा स्फोट झाल्याचं पाहायला मिळत आहे. कैद्यांबरोबरच तुरुंगातील कर्मचारीही मोठ्या प्रमाणावर कोरोनाग्रस्त असल्याचं स्पष्ट झालं आहे.
राज्यातल्या विविध कारागृहांमध्ये सध्या कोरोनाग्रस्त कैद्यांच्या संख्येत वाढ होत आहे. तसंच तुरुंगातील कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची मोठ्या प्रमाणावर लागण होतेय. सध्या कोरोनाची लागण असलेल्या विविध तुरुंगांतील कैद्यांची एकूण संख्या 197 आहे तर 94 तुरुंग कर्मचाऱ्यांनाही कोरोनाचा विळखा बसलाय. तुरुंगातील मृतांचा आकडा 15 असून यात 7 कैद्यांचा आणि 8 तुरुंग कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एकूण आकडेवारी पाहता आतापर्यंत 3172 कैदी आणि 744 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…