गुन्हे विश्व

आमच्या भांडणात का पडला ? असा जाब विचारत मध्यस्थावरच तलवारीने वार

आठ दिवसापूर्वीच्या भांडणाचा राग मध्यस्थावर काढत तू आमच्या भांडणात का पडला असा जाब विचारत भांडणे सोडविणाऱ्या मध्यस्थावरच तलवारीने वार करण्यात आल्याची घटना पुणे येथील खडकमाळ अळी येथील मनपा कॉलनीमध्ये घडली. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी रोहीतचा मित्र रेतिष व आरोपी यांच्यामध्ये आठ दिवसांपुर्व भांडणे झाली होती. ही भांडणे रोहीतने सोडवली होती. याचा राग सर्व आरोपींच्या मनात होता. शुक्रवारी रात्री रोहीत व ऋतीक हे मनपा कॉलनीतील रस्त्यावर थांबले असताना आरोपी तेथे आले. त्यांनी रोहीतला शिवी हासडत आमच्या भांडणात का पडला ? असा जाब विचारला. यानंतर फुग्याने आता ‘तुझी विकेटच काढतो’ म्हणत शर्टाच्या आत पाठिमागे लपवलेली तलवार काढली. या तलवारीने रोहीतवर वार केला. मात्र तो त्याच्या हाताच्या अंगठ्याला लागून गेला. यावेळी राहीतला वाचवण्यासाठी ऋतीकमध्ये पडला. मात्र आरोपींनी त्यालाही लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक माने करत आहेत.
या प्रकरणी रोहीत रागिर (20,रा.घोरपडे पेठ) याने फिर्याद दिली आहे. फुग्या उर्फ योगेश गाटे , सुशिल मिसाळ , आद्रया, भैय्या, करण उर्फ ठोब्या आगलावे, सनी शिंदे(सर्व रा.लोहीयानगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

15 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago