ताज्याघडामोडी

रेमडेसिवीर’चा गैरवापर होणार नाही याची दक्षता घ्यावी – प्रांताधिकारी गजानन गुरव

पंढरपूर, दि. 20 :-  तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची वाढ मोठ्याप्रमाणात होते आहे.  कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्राशानाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. तसेच कोरोना बाधित रुग्णांना आवश्यकतेनुसार देण्यात येणारे रेमडेसिवीर इंजेक्शन बाबत खाजगी रुग्णालयांनी कोविड नियमांचे तंतोतंत पालन करावे , या इंजेक्शनचा कुठेही काळाबाजार अथवा गैरवापर होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिल्या.

 कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी तसेच कोरोना बाधित रुग्णांना वेळेत औषधोपचार मिळावेत यासाठी खाजगी डॉक्टर , औषध विक्रेते यांची  प्रांत कार्यालय सास्कृंतिक भवन पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अरविंद गिराम, पोलीस निरिक्षक अरुण पवार, किरण अवचर, प्रशांत भस्मे , खाजगी डॉक्टर व औषध विक्रेते उपस्थित होते.

यावेळी प्रांताधिकारी गुरव म्हणाले,  कोरोना बाधित रग्णांना देण्यात येणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शन वाटपावर प्रशासनाचे नियंत्रण असून, रेमडेसिवीर इंजेक्शनची खाजगीरीत्या कुठेही विक्री होणार नाही. अन्न औषध प्रशासनाच्या संनियंत्रणात खाजगी कोविड रुग्णालयात इजेक्शन विक्री करण्यात येईल.  खाजगी रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांची संख्या यानुसार रेमडेसिवरचा इंजेक्शनचा आवश्यकते नुसार पुरवठा करण्यात येईल. उपलब्ध रेमडीसिवीर इंजेक्शन गंभीर रुग्णांना प्राधान्याने गरजेनुसार द्यावे. रुग्णांनी डॉक्टरवर विश्वास ठेवावा. तसेच डॉक्टरांनी कोणत्याही रुग्णांला  प्रिस्क्रीपनवर  बाहेरुन रुग्णांना इंजेक्शन  आणायला लावू नये. उपलब्ध रेमडेसिवीर इंजेक्शन पैकी 10 टक्के साठा हा फ्रंटलाईन वर्कर्ससाठी ठेवण्यात येईल असेही, प्रांताधिकारी गुरव यांनी सांगितले.

तालुक्यात कोरोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरी भागात वार्डस्तरीय समिती व ग्रामीण भागात ग्रामस्तरीय समिती कार्यरत ठेवाव्यात. रुग्णांलना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी कोवीड केअर सेंटरची उभारणीकरण्यासाठी  आवश्यकती कार्यवाही करावी. औषधांचा काळा बाजार व साठेबाजी वर आळा घालण्यासाठी मा. जिल्हाधिकारी यांनी रेमडेसिवीर वर नियंत्रण आणले आहे.रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहील यासाठी जिल्हास्तरावर आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.  सर्व खाजगी रुग्णालयांनी व औषध विक्रेत्यांनी  कोविड नियमांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे अशा सूचनाही श्री. गुरव यांनी यावेळी  दिल्या. 

यावेळी शहरातील लाईफ लाईन, गणपती, ॲपेक्स, जनकल्याण, वरदविनायक, गॅलक्सी आदी हॉस्पीटलमधील औषधसाठा याबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बोधले यांनी तालुक्यातील कोरोना बाधित रुग्ण, उपचार घेत असलेले रुग्ण तसेच बरे झालेले रुग्ण याबाबत तसेच आरोग्य विभागामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनेची  माहिती दिली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago