ताज्याघडामोडी

तुम्ही नागपुरी बांगड्या भरला होत्या का?

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या कठोर टीकेनंतर आता भाजपा आणि राष्ट्रवादीतील अनेक नेते आमने सामने येऊ लागले असून दोन्ही बाजूने टीकेचा भडीमार सुरु असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे  यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस  यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते  त्यानंतर सातपुतेंना उत्तर देताना खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांनी यास उत्तर दिले असून  तुम्ही  नागपुरी बांगड्या भरला होत्या का?’ असा सवाल विचारला आहे . त्यानंतर रोहिणी खडसे आणि सातपुते यांच्यात ट्विटरवॉर सुरु झाले आहे. 

‘देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून माशासारखे तडफडत आहेत’ अशा शब्दात एकनाथ खडसेंनी फडणवीसांवर टीका केली होती. त्यावर बोलताना ‘नाथाभाऊ आपण आयुष्यभर पैसे खायचे सोडून दुसरं काहीच केलं नाही आणि देवेंद्र भाऊबद्दल बोलत आहात.विरोधी पक्षनेता असताना तोडपाणी आणि मंत्री झाले तेव्हा भ्रष्टाचार. निष्कलंक देवेंद्रजीवर बोलण्या गोदर आरसा बघा सगळं लक्षात येईल’ असं ट्वीट राम सातपुतेंनी केलं होतं.

तर याला उत्तर देताना रोहिणी खडसे यांनी  अहो जर पैसे खात होते तर मग सत्ता होती तेव्हा कारवाई का केली नाही? तेव्हा काय तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का? आणि असेल तुमच्यात हिंमत तर सिद्ध करा ना? शामराव फडणविशी मिरची तुम्हाला का झोंबली? ज्यांचे बद्दल बोलले त्यांच्या तोंडात काय मिठाची गुळणी आहे का?’ अशी घणाघाती टीका रोहिणी खडसेंनी केली. 

यानंतरही सातपुते यांनी दुसर्‍यांदा ट्वीट करत आपला 2019 ला मुक्ताईनगरच्या जनतेने पराभव केला. कशाला बोलायला लावता ताई..? बात निकली ही है तो दूर तक जायेगी ..!’ असा टोला लगावला.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये निर्भया पथकाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी…

12 hours ago

कर्मयोगी विद्यानिकेतनचे अभिमानास्पद यश!

पंढरपूर : श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थी पियुष पोपट…

1 week ago

पंढरपूर सिंहगडच्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागात पालक मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उत्साहात संपन्न

पंढरपूर : प्रतिनिधी कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

3 weeks ago

स्त्रीशिक्षणाच्या क्रांतीची मशाल : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात विनम्र अभिवादन

पंढरपूर | प्रतिनिधी एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे मंगळवार, दि. १०…

3 weeks ago

राज्यस्तरीय ‘डिपेक्स’ प्रकल्प स्पर्धेमध्ये कर्मयोगी पॉलिटेक्निकचे घवघवीत यश

तंत्रज्ञानाच्या कुंभमेळ्यात कर्मयोगीच्या विद्यार्थ्यांचे यश नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय तंत्रज्ञान व प्रकल्प प्रदर्शनामध्ये कर्मयोगी इन्स्टिट्यूट…

4 weeks ago

पंढरपूर पंचायत समितीचा नूतन सभापती कोण ? ईश्वर चिट्ठी कि पालकमंत्री गोरे करणार फैसला ?

वसंत देशमुख-प्रमोद देशमुख यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष मागील महिन्यात पार पडलेल्या सोलापूर जिल्हा परिषद -तालुका…

4 weeks ago