ताज्याघडामोडी

भरचौकात ‘लेडी डॉन’ची  चाकूने वार करून हत्या

वस्तीत दबंगगिरी करणारी पिंकी शर्मा हिची हत्या करण्यात आली. चाकूने सपासप वार करुन पिंकीची निर्घृण हत्या करण्यात आली. वादावादीतून दोघांनी पिंकीला संपवल्याचा आरोप आहे. नागपुरात भरदिवसा घडलेल्या हत्याकांडाने एकच खळबळ उडाली आहे.नागपूर शहरातील तांडापेठेत भरचौकात पिंकी शर्माची हत्या करण्यात आली. अवैध धंदे करणाऱ्या व्यक्तींना पिंकी शर्मा धमक्या देत असल्याचं बोललं जातं. सोमवारी दुपारी पिंकीचा आरोपींसोबत वाद झाला होता. याच कारणावरुन दोघा आरोपींनी तिची हत्या केल्याचा आरोप आहे.

आरोपींनी पिंकीवर चाकूहल्ला केल्यानंतर ती सोमवारी संध्याकाळी पाचपावली भागात सैरावैरा पळत होती. अनेकांच्या घराच्या दिशेने धावाधाव करत ती मदतीसाठी याचना करत होती. मात्र तिच्या मदतीला कुणीही आलं नाही. पाठलाग करुन आरोपींनी तिला गाठलं आणि तिच्यावर चाकूचे सपासप वार केल्याची माहिती आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

18 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago