ताज्याघडामोडी

पोलिस असल्याची बतावणी करत दागिने केले लंपास

सांगली येथील एका अज्ञाताने पोलीस असल्याचे बतावणी करून आप्पासाहेब पाटीलनगरमधील महिलेचे २ तोळ्यांचे दागिने लंपास केले आहे. हि घटना शनिवारी घडली आहे. मंगल दिलीप नाईक (वय ५८, रा. आप्पासाहेब पाटीलनगर, सांगली ) या महिलेने या प्रकरणावरुन सांगली शहर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. यावरून शहर पोलिसांकडून त्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहितीनुसार, मंगल नाईक या शनिवारी सायंकाळच्या दरम्यान फिरण्यास गेल्या होत्या. त्यावेळी एक अज्ञात समोरून येत होता. समोर येऊन मी पोलिस आहे. कोरोनामुळे सध्या लॉकडाऊन आहे. आमचे साहेब आले आहेत. तुम्ही का फिरत आहात.

तुमच्याकडे असलेले दागिने तातडीने काढून द्या, नाहीतर पोलिस तुमच्यावर कारवाई करतील, असे त्याने महिलेला सांगितले. त्या महिलेने भिऊन गळ्यात असणारे २ तोळ्यांचे दागिने लगेच काढून दिले. तर तसेच, त्यावेळी त्या अज्ञाताने दुसर्‍या एका मुलाच्या हातातील अंगठी काढून घेतली. तर काही वेळानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्या महिलेचे लक्षात आल्यास तात्काळ त्या महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणावरून पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

11 minutes ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago