कोरोना लसीकरणाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. आता 18 पेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्तींना कोरोना लस दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा मोठा निर्णय घेतला आहे. 1 मे पासून लसीकरणाचा पुढचा सर्वात मोठा टप्पा आता सुरू होणार आहे. ज्यामध्ये 18 पुढील सर्व वयाच्या लोकांना लस दिली जाणार आहे.
देशात जानेवारीपासून लसीकरण सुरू झालं. टप्प्याटप्प्याने लस दिली जाते आहे. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना लस देण्यात आली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आलं. सोबतच 45 पेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती ज्यांना इतर आजार आहेत त्यांना कोरोना लस दिली जात होती. 1 एप्रिलपासून 45 पेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांचं लसीकरण सुरू करण्यात आलं आणि आता 1 मे पासून 18 पेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना लस दिली जाणार आहे.
देशातील जास्तीत जास्त नागरिकांचं लसीकरण करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. त्या दिशेने सरकारने टाकलेलं हे मोठं आणि महत्त्वपूर्ण असं पाऊल आहे. देशातील लसीकरणाला वेग दिला जातो आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…