ताज्याघडामोडी

धक्कादायक! कोरोना रुग्णावर मांत्रिकाकडून उपचार; महिलेचा मृत्यू

अमरावती, 17 एप्रिल: महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्याचा मेळघाट परिसर अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. याठिकाणी अंद्धश्रद्धेला खातपाणी घालणाऱ्या अनेक घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. यामध्ये आता आणखी एका घटनेची भर पडली असून मेळघाटात कोरोनाबाधित रुग्णावर एक मांत्रिक उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोरोनाबाधित महिलेवर उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाल्यानं ही घटना समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी मेळघाटातील सेमाडोह आरोग्य केंद्रात एका 45 वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यानंतर संबंधित महिलेवर रुग्णालयात उपचार करायचे सोडून नातेवाईक महिलेला उपचारासाठी मंत्रिकाकडे घेऊन गेले. मांत्रिकानेही संबंधित कोरोनाबाधित महिलेवर उपचार केले. पण उपचारादरम्यान महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री संबंधित महिलेवर अंत्यसंस्कार केल्याची माहितीही समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावात खळबळ उडाली आहे.

स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरदेखील आजही मेळघाटात अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात बाळगली जात आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. या घटनेची माहिती देताना जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी सांगितलं की, मेळघाटात यापूर्वी अनेक अशा अंधश्रद्धेच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे याठिकाणी आरोग्य विषयक जनजागृती होणं खूप महत्त्वाचं आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

13 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago