ताज्याघडामोडी

स्व.आ. भारत भालके म्हणाले, शैला गोडसे यांनी केले मंगळवेढ्याच्या पाणीप्रश्नासाठी प्रयत्न सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

स्व.आ. भारत भालके म्हणाले, शैला गोडसे यांनी केले मंगळवेढ्याच्या पाणीप्रश्नासाठी प्रयत्न
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
स्व.आ. भारत भालके हे मंगळवेढा तालुक्याच्या पाणी प्रश्नासाठी शैलाताई गोडसे यांनी प्रयत्न केले असल्याची कबुली दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधत आहे. आणि यामुळे मतदारसंघात सध्या चर्चांना उधाण आले आहे. गत विधानसभा निवडणुकीत मंगळवेढा येथील जाहीर सभेत स्व. भालके यांनी शैला गोडसे यांनी मंगळवेढा तालुक्यातील पाणीप्रश्नासाठी प्रयत्न केले असल्याची कबुली दिली होती. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात आहे. त्यानिमित्ताने इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचाराचा अक्षरशः धुरळा उडाला आहे. यामध्ये सोशल मीडियावर सध्या जुन्या व्हिडीओ क्लिप्स येण्याचे प्रमाण वाढले आहे. यातच गेल्या दोन दिवसांपासून ही जुनी व्हिडिओ क्लिप लक्षवेधक ठरत आहे.
मुळात प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून शैलाताई गोडसे या अपक्ष निवडणूक लढवत असूनसुद्धा आजपर्यंत सर्वात लक्षवेधक ठरल्या आहेत. कोणताही मोठा राजकीय पक्ष नाही किंवा एकही स्टार प्रचारक नसतानासुद्धा शैलाताई गोडसे यांची प्रचार यंत्रणा सध्या मतदारसंघात सर्वात लक्षवेधक ठरली आहे. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारापेक्षा झुंजार आणि संघर्षशील उमेदवार अशी चर्चा शैलाताई गोडसे यांच्या बाबतीत वारंवार मतदारसंघात होताना दिसत आहे. आणि आता या व्हिडीओ क्लिपमुळे स्वतः स्व. भालके यांनी पाणी प्रश्नाबद्दल शैला गोडसे यांनी प्रयत्न केले असल्याची कबुली दिली असल्यामुळे शैलाताई गोडसे यांच्याबद्दल मतदारांमध्ये पहिल्यापेक्षा जास्त आकर्षण निर्माण झाले आहे अशीही चर्चा होताना दिसत आहे. एकुणात या व्हिडीओ क्लिपमुळे शैला गोडसे यांच्या मताधिक्यात वाढ झाली तर आश्चर्य वाटायला नको अशीच परिस्थिती सध्या मतदारसंघात दिसत आहे.
शैला गोडसे या एक आंदोलनकरी महिला म्हणून सोलापूर जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. मंगळवेढा तालुक्याचा पाण्याचा प्रश्नासाठी असो अथवा पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील इतर कामांसाठी शैला गोडसे यांनी आंदोलन तसेच शासन दरबारी वारंवार पाठपुरावा केला आहे. यामध्ये स्व. भारत भालके यांनी मंजूर केलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजना असो अथवा म्हैसाळचे पाणी मंगळवेढा तालुक्याला मिळण्यासाठी शैला गोडसे यांनी आंदोलने केली आहेत. मुळात स्व. भालके यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात एक संघर्षशील लोकप्रतिनिधी अशी आपली प्रतिमा तयार केली होती. यावरच त्यांनी सलग तीन वेळा या मतदारसंघात विजय मिळविला. स्व. भालके यांच्यानंतर या मतदारसंघात संघर्षशील नेतृत्व म्हणून शैला गोडसे यांचेकडे पाहिले जात असल्याची चर्चा मतदारसंघात याआधी वारंवार झाली आहे. सध्याच्या या व्हिडीओ क्लिपमुळे शैला गोडसे यांच्या बाबतीत पुन्हा ती चर्चा होताना मतदारसंघात दिसत आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago