Categories: Uncategorized

“विठ्ठल साखर कारखाना विकला तरी कर्ज पिटनार नाही”

“विठ्ठल साखर कारखाना विकला तरी कर्ज फिटणार नाही”
सौ.शैलाताई गोडसे.
पंढरपूर(प्रतिनिधी)शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी उभा असलेला विठ्ठल साखर कारखाना पूर्वी राज्यात सर्वात जास्त दर.देणारा कारखाना म्हणून ओळखला जात होता. परंतु आज या कारखान्याला शेतकऱ्यांचे ऊसबील देता येत नाही.. की कामगारांचे पगार देता येत नाही. प्रचंड कर्जात अडकलेला हा कारखाना हा विठ्ठल कारखाना विकला तरी या कारखान्याचे कर्ज फिटू शकणार नाही. अशी अवस्था या कारखान्याची झाली आहे.चेअरमन दादा म्हणतात मी वारसदार आहे.आमदारकीचा वारसदार. व्हायला लोकांची कामे केली पाहिजे, शेतकऱ्यांचे भले केले पाहिजे ,पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील विकासकामे केली.पाहिजे, त्यासाठी शासन दरबारी आवाज उठवला पाहिजे, मंगळवेढा तालुक्यातील पस्तीस. गावातील. पाणी प्रश्नासाठी अंदोलन केले. पाहिजे असे जनहिताचे कोणते ही काम या दादांनी केलेले नाही.अशा वारसदार पुत्राला जनता स्विकारणार नाही.
दुसरे मंगळवेढ्यातील भूमीपुत्र दादा कधी पस्तीस गावच्या पाण्यासाठी कधी अंदोलन केले नाही.शेतकरी सभासदांचे सदस्त्व रद्द करणारे ,ऊसबील थकीत ठेवणारे, कामगारांचे पगार थकवणारे ,शेतकऱ्यांच्या आयुष्याला जेसीबीच्या साह्याने उध्वस्त करणारे दादा शेतकरी ,कष्टकरी जनतेचे काय कल्याण करणार आहे. असे हे दोन्ही दादा आज शेतकऱ्यांच्या कल्याणावर बोलतात. त्यांच्या बोँलण्याला जनता फसणार नाही.
मी या मंगळवेढा तालुक्यातील पस्तीस गावातील पाण्यासाठी , म्हैसाळ पाणी योजनेत आठ गावांचा समावेश केला आहे. त्यासाठी मी शिरनांदगी तलावात उपोषण करून अंदोलन केले आहे. माझ्या कडे कोणतीही सत्ता नसताना मी ही कामे करु शकते जनतेनी मला एकवेळ विधानसभा मध्ये जाण्याची संधी द्यावी. माझे.चिन्ह शिट्टी असून त्यापुढील बटण दाबून प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन सौ.शैलाताई गोडसे यांनी फटेवाडी,माळवाडी, सलगर येथील प्रचार सभेत मतदार बंधू भगिनींना केले वरील तीन्ही गावामधून सौ.शैलाताई गोडसे यांना जनतेतून पाठिंबा व प्रतिसाद मिळत आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago