मोठ्या मालकांना श्रद्धांजली वाहायची असेल तर समाधान आवताडे यांना विजयी करा-प्रणव परिचारक
पंढरप पंढरपूर तालुक्यातील खर्डी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ सभा झाली या सभेला राज्याचे माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत प्रणव परिचारक माऊली हळणवर रयतचे राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले परभणीचे भाजपा अध्यक्ष सुरेश उंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सभेत प्रणव परिचारक म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी प्रशांत मालकांनी विकास केला आहे, पांडुरंग परिवाराने आजपर्यंत युवकांची मोठी फळी निर्माण केली असून स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक मालकांना खरी श्रद्धांजली व्हायचे असेल तर समाधान आवताडे यांना विजयी करा पक्षश्रेष्ठींना आम्ही तसा शब्द दिला आहे.
सदाभाऊ खोत म्हणाले, कोरोना काळात रुग्णांचे हाल होत आहेत बेड उपलब्ध नाहीत ऑक्सिजन नाही लस उपलब्ध नाही व्हेंटिलेटर नाहीत असा कारभार राज्य सरकारचा चालू आहे स्मशानभूमीत प्रेत जाळायला जागा नाही राज्याचे मुख्यमंत्री मात्र घरातून बाहेर येत नाहीत जनतेला सांगतात घरी बसा घरी बसून काय माती खायची का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राष्ट्रवादीवाले भावनिकता निर्माण करून निवडून द्या, आमदार करा म्हणून मते मागत आहेत मात्र विठ्ठल बाजार, अर्जुन बँक, सुत मिल अगोदर चालु करा विठ्ठल कारखाना सुद्धा नेट चालवा मग मते मागायला या असे खोत म्हणाले.
उमेदवार समाधान आवताडे म्हणाले, पांडुरंग परिवार मोठ्या ताकतीने मागे आहे. मंगळवेढा तालुक्याने मागील दोन निवडणुकीत मला आमदार म्हणून स्वीकारले आहे, आता तुम्ही मताचा आशीर्वाद देऊन आमदार करायचे .प्रशांत मालक आणि मी मिळून पंढरपूर आणि मंगळवेढयाचा विकास करू, तालुक्यात औद्योगिक क्रांती निर्माण करून बेरोजगारांच्या हाताला काम देऊ असे आश्वासन त्यांनी दिले..