पंढरपूरात 300 बेडचे कोविड केअर सेंटर सुरु
पंढरपूर, दि. 13:- पंढरपूर शहरासह ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत त्यांची आरोग्याच्या द्ष्टीने आवश्यकती काळजी घेता यावी यासाठी गजानन महाराज मठ, पंढरपूर येथे 300 बेडचे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
गजानन महाराज मठ येथील कोविड केअर सेंटरची सुरवात आज करण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, गजानन महाराज संस्थान पंढरपूरचे व्यवस्थापक श्री.ठाकरे, डॉ.रणजीत रेपाळ, डॉ. वैशाली पाटील, डॉ.भाऊसाहेब जानकर, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.लवटे, डॉ शुभांगी गुंजाळ आदी उपस्थित होते.
कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने खाजगी तसेच शासकीय रुग्णांलयात मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचार घेत असल्याने बेडची कमतरता भासत आहे. कोरोना बाधितांना वेळेत उपाचार मिळावेत व त्यांना आवश्यक वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले असून, आरोग्य विभागामार्फत आवश्यक औषधसाठा, आरोग्य अधिकारी-कर्मचारी , स्वच्छता कर्मचारी यांची उपलब्धता करण्यात आली आहे. या कोविड केअर सेंटरमुळे शहरातील तसेच ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांच्या उपचारांची सोय उपलब्ध झाली असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…