सहकाररत्न बबनराव आवताडे हेच माझे आदर्श ः सिध्देश्वर आवताडे
मंगळवेढा(प्रतिनिधी)ः मी कुठल्या पक्षाशी अथवा कुठल्या नेत्याशी बांधील नसून सहकाररत्न बबनराव आवताडे हेच माझे आदर्श असून त्यांनी गेल्या ४० वर्षात केलेल्या राजकीय व सहकार क्षेत्रातील कार्याची शिदोरी आपल्या पाठीशी असून या शिदोरीच्या आधारेच आपण उमेदवार म्हणून जनतेसमोर असल्याचे प्रतिपादन अपक्ष उमेदवार सिध्देश्वर आवताडे यांनी केले.
ढवळस,धर्मगांव,उचेठाण,बठाण व मंगळवेढा येथे आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर प्रचार सभेत ते बोलत होते.
सिध्देश्वर आवताडे म्हणाले,माझी उमदेवारीही कोणाला निवडून आणण्यासाठी किंवा कोणाला पराभूत करण्यासाठी नाही.सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी म्हणून मी निवडणूक लढवत आहे.देशाला स्वातंत्र मिळाल्यापासून जे प्रश्न आहेत. ते आजही कायम आहेत.स्वातंत्र्यापासून आजपर्यंत नुसते लोकांच्या प्रश्नाचे राजकारण झाले मात्र प्रश्न सुटले नाहीत.विकासाच्या गोंडस नावाभोवती तालुक्याचे राजकारण फिरत राहिले.
चाळीस धोंडा,तेल धोंडा, अरळी उपसा सिंचन योजना,गदयागाढव हे शब्द आता परवलीचे होवून बसले परंतू ते आजही सुटलेले नाहीत.एका बाजूला पक्षाच्या उमेदवारांचे लोक आहेत. तर दुसर्या बाजूला जनतेसाठी चोवीस तास उपलब्ध असणारा सामान्य कार्यकर्ता म्हणून मी कार्यरत आहे.संपूर्ण मंत्रीमंडळ व विरोधी पक्षाचे नेते मंगळवेढयात येवून गेले. गेल्या अनेक वर्षापासून सत्ता भोगलेली माणसे मंगळवेढयात रोजच येत आहेत.आज त्यांचेवर ही वेळ का आली आहे. त्यांनी जर विकास कामे केली असती तर आज त्यांना प्रचाराला यायची गरज पडली नसती.हे सर्वजनता ओळखून आहे.त्यामुळे एकवेळ मला संधी दया,मी विकास काय आहे हे दाखवून पंढरपूर व मंगळवेढा तालुक्याचे चित्र बदलून दाखवतो अशी ग्वाही सिध्देश्वर आवताडे यांनी यावेळी दिली.
यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव आवताडे,खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन विठ्ठल घुले,संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रा.समाधान क्षीरसागर,शेतकरी नेते सिध्देश्वर हेंबाडे,तालीम संघाचे संचालक नामदेव पडवळे यांचेसह मारुती गायकवाड,आनंदा मोरे,धन्यकुमार पाटील,आण्णा टकले,अनिल माने,साधू मोरे,नवनाथ हेंबाडे,देवाप्पा हेंबाडे,पांडुरंग माने,अविनाश कुचेकर,पांडुरंग विभुते,गजानन आळगे,किशोर दत्तू,बाळू नागणे,अशोक पाटील,हणमंत पाटील,हरीभाऊ गडदे,समाधान माने,उत्तरेश्वर पाटील,भाऊसाहेब गडदे, दत्तात्रय गडदे,शंकर पाटील,पोपट गडदे,बंडू भोसले,संजय बळवंतराव,मधुकर बेदरे, बाळासाहेब घोडके, ज्ञानेश्वर बाबर,धर्मा कोळी,धनाजी साठे, बापू भालेराव, परमेश्वर कोळी,पांडुरंग साठे,आप्पा कोळी,पांडूरंग बाबर व कार्यकर्ते,ग्रामस्थ उपस्थित होते