ताज्याघडामोडी

पंढरपूरात समाधान आवताडे यांची सलग दुसऱ्या दिवशी प्रचार फेरी ; युवा कार्यकर्त्यांची तुफान गर्दी

पंढरपूरात समाधान आवताडे यांची सलग दुसऱ्या दिवशी प्रचार फेरी ; युवा कार्यकर्त्यांची तुफान गर्दी
मंगळवेढा-    पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतील भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांनी सलग दुसऱ्या दिवशी पंढरपूर शहरात प्रचार फेरी काढली, 11 एप्रिल क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सकाळी नऊ वाजता त्यांनी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासोबत फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्या नंतर इंदिरा गांधी चौकात प्रचार रॅलीला सुरुवात झाली ही रॅली इंदिरा गांधी चौकातून सुरू झाली पुढे अर्बन बँक ,दाळे गल्ली,, कडबे गल्ली, कैकाडी महाराज मठ परिसर,, डोंबे गल्ली परिसर ,अनिल नगर परिसर कॉटेज परिसरातून  ही प्रचार रॅली निघाली फटाक्यांची आतिषबाजी आणि हलग्यांच्या  निनादात निघालेल्या या रॅलीत युवकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता, नागरिक आपल्या दारासमोर थांबून उमेदवार समाधान आवताडे आमदार प्रशांत परिचारक यांना औक्षण करत होते ठीक ठिकाणी  हार घालून त्यांचे स्वागत करत होते याच भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहकार सेनेचे अध्यक्ष दिलीप धोत्रे यांची उमेदवार समाधान आवताडे यांनी भेट घेतली, या रॅलीत नागेश भोसले, शिवाजी कोळी, नानासाहेब सगरे, उपनगराध्यक्ष निलराज डोंबे, श्रीनिवास बोरगावकर, मुन्नागिर गोसावी,  संतोष जाधव, महादेव कवडे ,विकास मोरे ,विजय वाघ, अनंत कटाप,  भैय्या भिंगे, दत्ता काळे, भाऊसाहेब शिंदे नाईक, यांच्यासह परिचारक गटाचे आजी-माजी नगरसेवक पंढरपूर अर्बन बँकेचे संचालक, बाजार समितीचे संचालक ,पंढरपूर शहरातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago