Categories: Uncategorized

शेतकऱ्यांचे आयुष्य उध्वस्त करणाऱ्या दोन्ही दादांना पराभूत करा”…सौ.शैलाताई गोडसे

“शेतकऱ्यांचे आयुष्य उध्वस्त करणाऱ्या दोन्ही दादांना पराभूत करा”…सौ.शैलाताई गोडसे.

पंढरपूर(प्रतिनिधी)पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूकीत प्रचारासाठी केंद्रीय मंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री व अन्य नेते या मतदारसंघात येऊन जनतेचे,शेतकऱ्यांचे कल्याण करु म्हणू लागले आहेत. इतक्या दिवस झोपी गेलेले हे नेते आता या मतदारसंघात येऊन जनतेचे प्रश्न सोडवू.म्हणत आहेत. ज्या दोन्ही उमेदवार चेअरमनने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. त्यांची ऊसबील थकीत ठेवतात. कामगारांची पगारी देत नाहीत. अशा उमेदवारांसाठी हे मत मागायला आले आहेत. जनता हुशार आहे. या चेअरमनने केलेले पाप आता जनता मतदानाच्या रुपाने उघड केल्याशिवाय रहाणार नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सभासदत्व रद्द करणारे हे चेअरमन ला शेतकऱ्यांचा कळवळा आला आहे. पस्तीस गावच्या पाण्यासाठी कधी अंदोलन केले नाही. ते भूमीपुत्र म्हणू लागले आहेत. भूमीपुत्र कधी शेतकऱ्यांची ऊसबील अडवून ठेवत नसतो.त्यांचे सभासदत्व रद्द करत नसतो.असे हे चेअरमन दादा आता आमदारकीला मत मागत आहे.
विठ्ठल साखर कारखान्याचे दुसरे दादा कामगारांचे पगारी बुडवणारे ,शेतकऱ्यांचे ऊसबील थकवून त्यांचे आयुष्य उध्वस्त केले आहे. असे हे चेअरमन दादा वारसदार म्हणून आमदारकी मिळवू पहात आहे. अशा लबाड,फसव्या नेत्यांना या निवडणुकीत पराभव करा.मला एकवेळ जनतेची सेवा करण्यासाठी, पस्तीस गावातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी, महिलांना आर्थिक बाबतीत सक्षम करण्यासाठी, बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी फक्त एकदाच संधी द्या.शिट्टी समोरील बटन दाबून मला प्रचंड मताने निवडून द्या. असे आवाहन सौ.शैलाताई गोडसे यांनी तळसंगी,मरवडे ,येड़्राव,येथील प्रचार सभेत सौ.शैलाताई गोडसे यांनी मतदारांना केले

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago