बारामती कृषी विकास संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार हे आज पंढपुरात असून आज त्यांनी थेट परिचारकांच्या वाड्यात जाऊन स्व.आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.यावेळी युटोपियन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक व प्रणव परिचारक हे उपस्थित होते.हि केवळ सात्वनपर भेट असल्याचे दिसून येत असले तरी राजकीय वर्तुळात मात्र या भेटीचे वेगळे अर्थ काढले जात आहेत.
बारामती कृषी विकास संस्था तसेच बारामती एग्रोच्या माध्यमातून राजेंद्र पवार यांनी फार मोठे उल्लेखनीय काम केले असून याच मुळे ते अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.देशातील साखर कारखानदारांच्या संघटनेची धुरा अनेक वर्षे राजेंद्र पवार यांनी संभाळली आहे.तर पांडुरंग सहकारी साखर कारखाना व युटोपियन शुगर या साखर कारखान्याचा कारभारही राज्यात उल्लेखनीय ठरला आहे.राजेंद्र पवार आणि परिचारक यांचे स्नेहसंबंध राजकारण विरहित असल्याचे मानले जाते.आणि यातूनच राजेंद्र पवार हे आज परिचारकांच्या भेटीला वाड्यावर गेले असावेत.
मात्र हा सारा घटनाक्रम घडत असतानाच विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राजेंद्र पवार यांचे सुपुत्र,राष्ट्रवादी कॉग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे आज पंढरपूर शहरात भगीरथ भालके यांच्या विजयासाठी विविध ठिकाणी सभा घेत असतानाच राजेंद्र पवार आणि उमेश परिचारक यांची भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
संशोधनातून भारताला विकसित देश बनवा- डॉ. परिक्षित महाल्ले, पुणे एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ…
पंढरपूर - गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये यंदाचा ‘राष्ट्रीय शिक्षण…
लाईफलाईन हॉस्पिटल येथे कॅन्सरसह विविध गंभीर आजारावर शस्त्रक्रियांची सोय डॉ. शैलेश पुणतांबेकर हे पुण्यातील एक…
पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन…
पंढरपूर- ‘गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा 'माजी विद्यार्थी मेळावा' आणि ‘पदवीप्रदान समारंभ’ स्वेरी कॉलेज कॅम्पस मध्ये येत्या…
पंढरपूर सिंहगडमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन: पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…