डॉ.रोंगे समर्थकांची भाजपा प्रचारात आघाडी
पंढरपूर- पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक लागली असून पोटनिवडणुकीचे इच्छुक उमेदवार स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी व गोपाळपुरच्या स्वेरी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील समर्थकांची व संस्थात्मक परिवारांची व्यापक बैठक घेतली.
जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या विनंतीवरून ही बैठक लावली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माढा मतदार संघाचे खासदार व पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे निवडणूक प्रमुख रणजितसिंह राजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली व सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर, युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजपाचे जिल्हा व तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविकात संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे म्हणाले की, ‘भारतीय जनता पार्टी या पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून आ. प्रशांत परिचारक यांच्याप्रमाणे आपणही पंढरपूर-मंगळवेढा तालुक्याच्या विकासासाठी पक्षादेश मानण्याचे निश्चित केले आहे. पक्षाने या निवडणुकीपूर्वीच सोलापूर जिल्हा शिक्षण संस्था आघाडी जिल्हाप्रमुख पदी निवड करून शिक्षण क्षेत्रातील एक मोठी जबाबदारी सोपवली आहे.’ असे सांगितले. डॉ. रोंगे सरांनी आपल्या समर्थकांना ‘वैयक्तिक भेटीगाठी देऊन व जीवाचे रान करून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार समाधान अवताडे यांना प्रचंड मताधिक्क्याने निवडून द्यावे.’असे आवाहन केले आहे. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना खा. रणजितसिंह राजे नाईक-निंबाळकर म्हणाले की, ‘स्वेरीचे सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे सरांनी मनाचा मोठेपणा दाखवुन भाजपाचे अधिकृत उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ समर्थकांनाही या प्रवाहाबरोबर राहून पंढरपूर -मंगळवेढा तालुक्याचा विकास करूया. हा निर्णय दोन्ही तालुक्याच्या हिताचा आहे. डॉ. रोंगे सरांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी दिल्लीपासून आहे. समर्थकांनी येत्या १७ तारखेपर्यंत अहोरात्र कष्ट घेऊन संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या या पोटनिवडणुकीत संपूर्ण राज्याचे समीकरणच बदलणार आहे. शेतकरी, व्यापारी, शेतमजूर यांचा आक्रोश या निवडणुकीच्या माध्यमातून दाखवण्याची वेळ आली आहे. तरी भाजपाचे उमेदवार समाधान अवताडे यांना प्रचंड मताधिक्क्याने निवडून द्या’ असे सांगून जमलेल्या सर्व समर्थकांचे, पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे आभार देखील त्यांनी मानले. यावेळी सहकार परिषदेचे शेखर चरेगावकर म्हणाले की, ‘उच्चतंत्र शिक्षणाच्या माध्यमातून डॉ.रोंगे सरांनी शिक्षण क्षेत्रात अदभूत चमत्कार दाखवलेला आहे. रोंगे सरांच्या या आवाहनाला सर्वांनी ताकतीने प्रतिसाद द्या.