२५२ पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत आता सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून आमदार प्रशांत परिचारक हे संपूर्ण मतदार सर्वत्र सभा,पदयात्रा,प्रचार बैठकांच्या माध्यमातून पक्षाने सोपविलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी ग्राउंड वर्क करत असतानाच युटोपियन शुगरचे चेअरमन व पंढरपूर-मंगळवेढा विकास आघाडीचे अध्यक्ष उमेश परिचारक हे पंढरपूर शहारत विविध प्रभागात समर्थक नगरसेवक,प्रभागातील कार्यकर्ते यांच्या समवेत बैठका घेत आहेत.प्रचार ते प्रत्यक्ष मतदान यामधील प्रत्येक टप्प्याचे या बैठकांमधून नियोजन केले जात असून प्रत्येक मत हे महत्वपूर्ण मानून कार्यकर्त्यांनी तळमळीने काम करत पक्षाने सोपविलेली जबाबदारी पार पाडावी अशी अपेक्षा उमेश परिचारक हे या बैठकीत व्यक्त करताना दिसून येत आहेत.
पंढरपूर शहर तालुकाच्या राजकारणात परिचारकांचा पक्ष कुठला हे महत्वाचे न मानता निष्ठा राखत काम करणारा कार्यकर्ता वर्ग मोठा आहे.पांडुरंग परिवाराचे आर्थिक दृष्टया सक्षम संस्थांचे जाळे आणि यामुळे निर्माण झालेला लोकसंग्रह हे परिचारकांचे बलस्थान आहे. त्यामुळेच सत्ता असो अथवा नसो परिचारकांचा कार्यकर्ता कधी फुटत नाही अशी चर्चा कायम राजकीय वर्तुळात होत आली आहे.यावेळी भाजपने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिल्याने परिचारक सर्मथक पूर्ण झोकून देऊन प्रचार करणार का अशी शंका व्यक्त केली जात होती मात्र उमेश परिचारक यांनी मतदान केंद्रनिहाय नियोजनाची सूत्रे आपल्या हाती घेत शहर आणि २२ गावात बैठकांचा धडाका लावला असून समाधान आवताडे यांना ज्या प्रभागातून जास्तीत जास्त मताधिक्य मिळेल तेथील परिचारक समर्थक कार्यकर्त्यांची पुढील राजकीय अधिक दखलपात्र होणार आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…