पंढरपूर(प्रतिनिधी)शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या या साखर कारखानदारांना ताळ्यावर आणल्या शिवाय राहणार नाही.असे वक्तव्य सौ.शैलाताई यांनी लक्ष्मी टाकळी येथील प्रचारसभेत केले.
शेतकऱ्यांचे ऊसबील थकवणाऱ्या चेअरमन साठी आज सर्व सत्ताधारी नेते आज या मतदारसंघात प्रचारा साठी आले आहेत.मंगळवेढा तालुक्यातील पस्तीस गावाचा पाणी प्रश्न, या तालुक्यातील रस्ते, रखडलेली विकास कामे या समस्येवर कुणी चेअरमनने अंदोलन केले नाही. ते आज जनतेचे आमदार होऊ पहात आहे. शेतकऱ्यांना, कामगारांना, बेरोजगार युवकांना खोटे आश्वासन देऊन आजपर्यंत या सर्वांची दिशाभूल केली जाते अशा उमेदवारांच्या प्रचारासाठी हे मोठे नेते येत आहेत.
स्वतःला भूमीपुत्र म्हणवून घेणारे निवडणूक आली की त्यांना शेतकरी कष्टकरी, महिला भगिनींची आठवण येते.पाण्याचा प्रश्न आठवतो परंतू या सर्व समस्ये साठी कधी जन अंदोलन केले नाही. सभासद शेतकऱ्यांचे सभासदत्व रद्द केले जाते.या शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर उपाययोजना करण्यात येत नाही. शेतकरी कायमस्वरूपी आपल्या अंकीत कसा रहिल हेच पाहिले जाते. अशा स्वार्थी उमेदवारांना जनतेनी मतदान करु नये. हे भूमीपुत्र फक्त निवडणूक पुरते आपला चेहरा दाखवतात. अशा उमेदवारांना जनतेनी घरचा रस्ता दाखवावा.
विठल कारखाना चे चेअरमन नी अर्जुन बँक च्या साठ कोटी ठेवी ज्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या घामाची रक्कम आहे. त्या पैशाचे काय झाले. याचे उत्तर या चेअरमनने द्यावे. शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या अशा उमेदवारांना मतदानाच्या रुपाने माती चारा.अशा लबाड साखर सम्राटांच्या प्रचारा साठी केंद्रीय मंत्री आले आहेत. या सर्व मंत्र्याना जनतेने विचारावे या दोन्ही तालुक्यातील विकासाचे काय झाले. पस्तीस गावच्या पाण्याचे काय झाले. हे मतदारांनी आवश्य विचारावे.मतदारांनी विचार करण्याची वेळ आली आहे. मला फक्त एकदाच संधी द्या.मला या निवडणुकीत शिट्टी या चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करा असे आवाहन लक्ष्मी टाकळी, कासेगाव येथील प्रचारसभेत सौ.शैलाताई गोडसे यांनी केले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…