पंढरपूरात निर्माण करणार अतिरिक्त 120 बेडचे कोविड हॉस्पिटल
पंढरपूर दि. 10: कोरोनाबाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी पंढरपूरात विविध चार डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलच्या माध्यमातून अतिरिक्त एकूण १२० बेडची क्षमता निर्माण करण्यासाठी वैद्कीय अधिक्षकांनी आवश्यकती कार्यवाही करावी अशा, सूचना उपजिल्हाधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या.
तालुक्यातील कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचनेनुसार उपजिल्हाधिकारी ढोले यांनी पंढरपूर नगरपरिषदेत शहरातील खाजगी डॉक्टर व ऑक्सिजन पुरवठाधारक यांची बैठक घेतली.
बैठकीस मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, नगरपालिकेचे डॉ बी. के. धोत्रे, डॉक्टर संभाजी भोसले, गणपती हॉस्पिटल डॉ कारंडे, गॅलक्सी हॉस्पिटल डॉ. गुजरे, डॉ सुरज पाचकवडे,ॲपेक्स हॉस्पिटल डॉ. आरिफ बोहरी लाईफ लाईन डॉक्टर संजय देशमुख उपस्थित होते.
श्री. ढोले म्हणाले, रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा अखंडीतपणे सुरु राहील तसेच रुग्णांलयात वेळेत ऑक्सिजन प्राप्त होईल याची दक्षता ऑक्सिजन पुरवठादाराने घ्यावी. यासाठी नियंत्रण अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात रहावे.कोविड केअर सेंटर येथील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता वैद्यकीय सुविधेसाठी निमा संघटनेतील डॉक्टरांची मदत घेवून होम असोलेशनची सुविधा निर्माण करावी. होम असोलेशनमध्ये असलेले नागरिक बाहेर फिरणार नाहीत यांची दक्षता नगरपालिका प्रशासनाने घ्यावी. त्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व खाजगी व शासकीय वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, प्रशासन यांनी एकात्मिक प्रयत्न करावेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.
अतिरिक्त 120 बेडच्या क्षमता असलेले नवीन चार डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल निर्माण करण्यासाठी वैद्यकीय अधिक्षकांनी आवश्यक कागदोपत्री प्रक्रिया करुन कार्यवाही करावी. लाईफ लाईन हॉस्पिटलने पोलीस प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी यांच्या उपचारासाठी डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल तात्काळ कार्यान्वित करावे. शहरातील लॅब धारकांनी रॅपिड ॲटिजेन तपासणी व आरटीपीसार तपासणीचे दर शासनाच्या ठरवून दिलेल्या नियमानुसार घ्यावेत. त्याबाबत दर पत्रक दर्शनी भागावर लावावे. डेडीकेटेड कोविड हॉस्पिटलचे फायर ऑडीट व इलेक्ट्रीसिटी ऑडिट संबधित रुग्णालयांनी करुन घ्यावे. याबाबत रुग्णालयांची तपासणी नगर पालिका प्रशासनाने करुन घ्यावी अशा सूचनाही श्री.ढोले यांनी यावेळी दिल्या.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…