समाधान आवताडे यांच्या पंढरपूरात पदयात्रा, घरभेटीला उत्स्फूर्त प्रतिसाद
मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे, मंगळवेढ्यातील 65 गावांचा झंझावात दौऱ्यानंतर, पंढरपूर तालुक्यातील 22 गावांच्या प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर शनिवारी पंढरपूर शहरात आमदार प्रशांत परिचारक यांच्या सोबतीने समाधान आवताडे यांनी प्रचार फेरी काढली, घरोघरी जाऊन भेटी दिल्या.
प्रारंभी पंढरीच्या पांडुरंगाचे बाहेरून दर्शन घेतले, श्री विठ्ठलाचा आशीर्वाद घेतल्यावर प्रचार फेरीला सुरुवात झाली, पंढरपूर शहरातील नामदेव पायरी, महाद्वार चौक, विजापूर गल्ली, कालिका देवी चौक, संभाजी चौक, काळा मारुती, चौफाळा, नाथ चौक, घोंगडे गल्ली, प्रदक्षिणा रोड आतील बाजू या भागात ही रॅली व घरभेट दौरा झाला, अतिशय उत्स्फूर्तपणे पंढरपूर शहरातील भारतीय जनता पक्षाचे युवा कार्यकर्ते यात सहभागी झाले होते,भाजपची प्रचार रॅली आल्याचे माहीत होताच घरोघरी नागरिक उमेदवार समाधान आवताडे यांचे स्वागत करत होते, अनेकांनी त्यांच्या गळ्यात हार घालून मिठाई भरवत आशिर्वाद दिला, महिलांनी औक्षण केले, या प्रचार रॅलीत आमदार प्रशांत परिचारक गटाचे अनेक नगरसेवक, शहरातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…
NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…
गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर सातारा : पुणे विभाग…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…