राज्य सांभाळता येत नाही मुख्यमंत्री ठाकरे राजीनामा द्या ; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा घणाघात
शिवराय-भीमरायांचे महाराष्ट्र बदनाम करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुम्ही राजीनामा द्या अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीतील भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची पंढरपूर व मंगळवेढ्यात सभा झाली, या सभेला आमदार प्रशांत परिचारक, अनुसूचित जातीजमाती विभाग भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव, रिपाइं राज्य सरचिटणीस राजाभाऊ सरवदे, प्रदेश महामंत्री सचिन आरडे ,भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, प्रदेश सचिव संजीव खिलारे ,रिपाइं जिल्हाध्यक्ष जितेंद्र बनसोडे, युवक अध्यक्ष बापू बनसोडे, रिपाइं अध्यक्ष दीपक चंदनशिवे, भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे, संत दामाजी कारखान्याचे व्हाईस चेअरमन अंबादास कुलकर्णी, संचालक सचिन शिवशरण, पंढरपूरचे श्रीमंत मस्के, जिल्हा सरचिटणीस सोमनाथ भोसले ,जिल्हा उपाध्यक्ष बाबा साखरे, जिल्हा सचिव चिमाजी कसबे, तालुका अध्यक्ष अशोक शिवशरण, लक्ष्मण मस्के, भारत शिंदे, ब्रह्मदेव वाघमारे, श्रीमंत सलवदे, महादेव लोखंडे यांच्यासह रिपाइं आठवले गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंगळवेढा आणि पंढरपूरचे मजबूत होणार आहे वाडे..,
कारण निवडून येणार आहेत समाधान आवताडे…,
ते दिवस आठवायचे आहेत,
आणि कमळाला विधानसभेत पाठवायचे आहे…,
जर तुम्हाला करायचे आहे समाधान…,
तर निवडून द्या अवताडे समाधान…,
जो द्यायला तयार आहे आपली जान,
तर का निवडून नाही येणार समाधान….,
घोषणा देणाऱ्या मतदाना दिवशी थोडी घेऊ नको..,आणि राष्ट्रवादीला मतदान देऊ नको…,
सध्या महाराष्ट्राचे नाव देशामध्ये गाजे…,
कारण जेलमध्ये आहे सचिन वाझे..,
ज्याने केली आहे मोठी चूक…,
त्याचे नाव आहे अनिल देशमुख…,
अशा कवितांनी मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली
आठवले म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांना न्याय मिळाला पाहिजे, महिलांवरील अन्याय थांबला पाहिजे, मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणी करणारा रिपब्लिकन पक्ष आहे जो देशात भारतीय जनता पार्टी सोबत आहे.
कोरोनाचा सामना करता करता विरोधकांचाही सामना करायचा आहे,राज्यामध्ये सचिन वाझे प्रकरणानंतर महाविकास आघाडीचे सरकार डळमळीत झाले आहे, छत्रपती शिवराय व महामानव भीमराव त्यांचा महाराष्ट्र बदनाम करण्याचा घाट या तीन तोंडाच्या सरकारने घातला आहे ज्या पद्धतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला त्यानंतर राज्याची सत्ता चालविता न येणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुम्ही राजीनामा द्या अशी मागणी रामदास आठवले यांनी आपल्या भाषणात केली.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…