शेतकऱ्यांच्या वीज तोडायचे आदेश देणाऱ्या अजित पवारांना आता शेतकऱ्यांचा पुळका का आला ? असा सवाल भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी केला.
मंगळवेढा – भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक येथील उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी पाटकळ खुपसंगी गोणेवाडी शिरशी नंदेश्वर खडकी जुनोनी हाजापूर या भागात सभा झाल्या या सभेला माजी मंत्री तथा रयत क्रांतीचे संस्थापक सदाभाऊ खोत, आमदार राम सातपुते ,माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, रयतेचे राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले ,भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, जिल्हा संघटक शशिकांत चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव नागणे,दूध संघ संचालक जयंत साळे, लक्ष्मण मस्के, हे दौऱ्यात उपस्थित होते.
श्रीकांत देशमुख म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत ज्यांनी अधिवेशनात शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश दिले ते आज शेतकऱ्यांच्या पुळक्याची भाषा करत आहेत , याच राष्ट्रवादीने मंगळवेढ्यात घर फोडण्याचे आणि पेटविण्याचा प्रयत्न केला आहे मात्र आपल्या घरातलाच उमेदवाराला आमदार करा, येणारी 17 तारीख परिवर्तनाची नांदी आहे समाधान आवताडे यांच्या रूपाने तुमचे प्रश्न मांडणारा नेतृत्व निवडून द्या.
सदाभाऊ खोत म्हणाले, आजोबांनी 35 गावच्या पाण्यावर मतदान केले,बापाने पण 35 गावच्या पाण्यावरच मतदान केले आता पोरगा पण 35 गावच्या पाण्यावर मतदान करण्याची वेळ आली आहे .एवढा हा प्रश्न भिजत पडला आहे, हा प्रश्न सोडवायचा असेल तर लोक लढा उभा करण्यासाठी खमक्या आमदार मधून समाधान आवताडे यांना निवडून द्या. नानांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी निवडून द्या म्हणून आज मते मागत आहेत, मग गेल्या तीन टर्ममध्ये नानांनाच आपलं स्वप्न पूर्ण करता आले नाही बाबा मग तू कसा स्वप्न पूर्ण करणार ? कर स्वप्न पूर्ण कारखाना चांगला चालव, बँक चांगली चालव, सूत मिल काढ, शेतकऱ्यांना चांगला भाव दे, कामगारांच्या पगारी कर . भावनेपेक्षा या भागाचा विकास कोण करेल त्यांना मतदान करूया समाधान आवताडे आपल्यासाठी लढत आहेत त्यांना आपण ताकद देऊ या.
अजित दादा दोन दिवस तळ ठोकून आहेत , ते या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री होणार नाहीत पण त्यांना पंढरपूरचा विठ्ठल कारखाना घशात घालायचा आहे, आजपर्यंत बारामती ऍग्रो ने 50 कारखाने घशात घातलेत म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस नसून ही अलिबाबा 40 चोरांची टोळी आहे, सगळं काही त्यांनाच गिळंकृत करायचे आहे. पण शेतकऱ्यांचा कारखाना वाचवायचे खरे काम समाधान आवताडे यांनी मंगळवेढ्यात केले.
महाविकास आघाडीचे तीन तोंडाचे सरकार नसून एक गाढव, एक डुक्कर आणि एक कुत्र्याचे तोंड असलेले सरकार आहे कोण कुठे जातंय हेच समजत नाही. ज्याला जे वाटतंय ते खात सुटलयं, ही निवडणूक त्यांचा अंत आहे त्याची सुरुवात मंगळवेढा-पंढरपूर मधून झाली.
मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजप व मित्र पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांनी आपल्या शुक्रवारच्या प्रचार दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला, आज भाकरी फिरवायची वेळ आली आहे, नाही फिरवल्यावर ती करपेल.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विश्वास टाकला या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. मंगळवेढा शहरालगत 118 एकर जमीन एमआयडीसीसाठी दिली एवढ्या जमिनीमध्ये फक्त सौरऊर्जा उद्योग उभारला. त्यामुळे या मतदारसंघात औद्योगिक क्रांती आणणे गरजेचे आहे, युवकांच्या हाताला काम महत्वाचे आहे.
विरोधक सहानुभूतीवर निवडणूक लढवत आहेत, जर भारत नानांना खरीच श्रद्धांजली अर्पण करायची होती तर अधिवेशनात बारामती सिंचन योजनेला दिलेला 500 कोटींचा निधी मंगळवेढ्याच्या 35 गावांच्या पाण्यासाठी का वळवला नाही? असा सवाल आवताडे यांनी उपस्थित केला.
या प्रचारदौऱ्यानिमित्त उपस्थित प्रमुख *महाराष्ट्र राज्य माजी मंत्री, रयत क्रांतीचे पक्षप्रमुख सदाभाऊ खोत,आमदार राम सातपुते,भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख,माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे,रयत क्रांती संघटना महाराष्ट्र कार्याध्यक्ष दीपक भोसले,रयत क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष राहुल बिडवे,भाजप जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर वाडदेकर,भाजप जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण,दामाजी कारखाना संचालक सुरेश भाकरे,दामाजी कारखाना संचालक सचिन शिवशरण,प्रा.येताळ भगत सर,प्रा.दत्तात्रय जमदाडे,त्या त्या गावातील सरपंच, चेअरमन, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते..