ताज्याघडामोडी

स्वेरीच्या प्रा.अंतोष द्याडे, सोनाली लांडगे आणि स्वरित भंडारी यांची गुगल क्लाऊड रेडी फॅसीलीटेटर मध्ये प्रतिनिधी म्हणून निवड

स्वेरीच्या प्रा.अंतोष द्याडे, सोनाली लांडगे आणि स्वरित भंडारी यांची
गुगल क्लाऊड रेडी फॅसीलीटेटर मध्ये प्रतिनिधी म्हणून निवड
पंढरपूर- इंटरनेटच्या माध्यमातून ‘गुगल’ या जगविख्यात संस्थेने ‘गुगल क्लाऊड रेडी फॅसीलीटेटर प्रोग्राम’ नावाच्या तीन महीने कालावधी असलेल्या ‘ट्रेनिंग प्रोग्राम’चे आयोजन केले होते. त्यात गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन ॲन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित  कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील कॉम्प्युटर अँण्ड सायन्स इंजिनिअरींगच्या प्रा.अंतोष महादप्पा द्याडे यांनी ट्रेनिंग प्रोग्राम’ मध्ये सहभाग घेवून यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्धल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.एवढेच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यातील ते गुगल क्लाऊड रेडी फॅसीलीटेटर प्रतिनिधी देखील बनले आहेत.
       या प्रोग्रॅममध्ये प्रा. द्याडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी म्हणून सोनाली तुकाराम लांडगे आणि स्वरित बजरंग भंडारी यांनी देखील एक महिन्याचे ट्रेनिंग यशस्वीपणे पूर्ण केले आहे. त्यांना गुगल क्लाऊडचे अधिकारी अक्षित जैन, मयुर राठी आणि अजिंक्य कोल्हे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. हे गूगल क्लाऊड प्रतिनिधी असून त्यांनी प्रा. द्याडे यांना बहुमोल मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक द्वारे प्रोग्रॅम शिकवले. गेल्या १ मार्च रोजी याचे ट्रेनिंग सुरु झाले होते. त्यात भारतातून १३२ प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. एक महिन्याच्या या कालावधीत  प्रा. द्याडे यांनी प्रात्यक्षिक यशस्वीरीत्या पूर्ण केले. हे  प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यामुळे प्रा. द्याडे आता गुगल क्लाऊड चे प्रतिनिधी म्हणून गणले जाणार असून सोलापूर जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यातील विद्यार्थी प्रा. द्याडे यांच्या कडून गुगल संबंधी माहिती व प्रशिक्षण घेवू शकतात. प्रा. द्याडे यांनी पहिल्याच दिवशी ५३३ प्रशिक्षक विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले असून त्यांना ते तीन महिने गुगलचे प्रशिक्षण देणार आहेत. त्यात आणखी इतर कोणाला जर गुगल संबंधी माहिती व प्रशिक्षण पाहीजे असेल तर त्यांनी प्रा. द्याडे (मोबा.क्रमांक -९५४५५५३४४५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील केले आहे. प्रा. अंतोष द्याडे हे गेल्या दहा वर्षापासून स्वेरी इंजिनिअरिंगच्या कॉम्प्युटर अँण्ड सायन्स इंजिनिअरींग विभागामध्ये कार्यरत असून इंटरनेट संबंधी त्यांचा प्रचंड अभ्यास आहे. गुगल क्लाऊडमध्ये प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्धल प्रा.अंतोष द्याडे, सोनाली लांडगे आणि स्वरित भंडारी यांचे स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

14 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

15 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago