ताज्याघडामोडी

पवार यांचा डोळा आता पंढरपुरच्या विठ्ठल कारखान्यावर !

मंगळवेढा पंढरपूर विधानसभा निवडणुकीतील भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी गणेश वाडी शेलेवाडी डोंगरगाव अकोला गुंजेगाव ममदाबाद या भागात प्रचार सभा झाल्या या सभांना राज्याचे माजी मंत्री राम शिंदे माजी मंत्री सदाभाऊ खोत आमदार सचिन कल्याण शेट्टी भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख रयत क्रांती चे कार्याध्यक्ष दीपक भोसले भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार येताळा भगत औदुंबर वाडदेकर मच्छिंद्र भोसले सचिन शिवशरण भाजप जिल्हा संघटक शशिकांत चव्हाण यांची उपस्थिती होती.
आपल्या भाषणात राम शिंदे म्हणाले, अजित पवारांनी नगर जामखेडचा जगदंबा कारखाना ताब्यात घेतला, नुकतच समजले आहे त्यांनी करमाळा तालुक्यातील आदिनाथ सुद्धा घेतला आहे ,आता त्यांचा डोळा विठ्ठल कारखान्यावर आहे या पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्यास याच मुळे उशीर झाला त्यांना उमेदवारी पार्थ पवार यांना द्यायची होती मात्र ते जमले नाही, शेवटी विठ्ठल कारखाना अवसायनात काढायचा आणि तो आपल्या ताब्यात घ्यायचा हा डाव अजित पवारांचा असल्याचा आरोप शिंदे यांनी केला.
     
निवडणूक प्रचारादरम्यान समाधान आवताडे म्हणाले की ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आहे. महा विकास आघाडीने शेतकऱ्यांची वीज तोडण्याचे काम केले पाणी हे आग विझविण्याचे काम करते परंतु येथील पाणी राजकारणाची आग भडकावण्याचे काम करते आरोग्य शैक्षणिक वाडीवस्ती रस्ता पाणी समस्या आहेत पण गेली अकरा वर्षे तुम्ही काय केले? गरजू लोकांच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून कोणतेही राजकारण न करता विक्रमी निधी दिला.या मातीतील ऋण फेडण्याची आता वेळ आली आहे एम आय डी सी ची जागा सौरऊर्जेला दिली.मत रुपी आशीर्वाद द्या.

 

अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचे भाजप मित्र पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचार सभांना हजेरी लावली. आमदार कल्याणशेट्टी म्हणाले, ही निवडणूक विरोधक केवळ सहानुभूतीच्या आधारे लढवली जात नाही तर कर्तृत्वावर लढवली जाते, त्यांच्याकडे विकासाचे कोणतेही मुद्दे नाहीत, समाधान आवताडे हे कर्तृत्ववान, विकसनशील नेतृत्व आहे जे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर आहे. रोज एक मंत्री घरी जातोय, भ्रष्टाचारात नवी नावे समोर येताहेत त्यामुळे या सत्तेला सुरुंग लागला असून काउंटडाऊन सुरू झाले आहे या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्ता बदल पक्का असल्याचा विश्वास आमदार कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केला.   

 या प्रचारदौऱ्यानिमित्त उपस्थित प्रमुख *भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, माजी मंत्री प्रा. राम शिंदे, महाराष्ट्र राज्य माजी मंत्री, रयत क्रांतीचे पक्षप्रमुख सदाभाऊ खोत,सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष विनायक जाधव, माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते,भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख,भाजप माजी जिल्हाध्यक्ष शहाजीबापू पवार,रयत क्रांती संघटना महाराष्ट्र कार्याध्यक्ष दीपक भोसले,रयत क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष राहुल बिडवे,भाजप जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर वाडदेकर,भाजप जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण,दामाजी कारखाना संचालक सुरेश भाकरे,दामाजी कारखाना संचालक सचिन शिवशरण,दुध संघाचे संचालक शिवाजीराव नागणे, युनूस शेख, नंदकुमार हावनाळे, मिस्टर पंचायत समिती सदस्य लक्ष्मण मस्के,प्रा.येताळ भगत सर,प्रा.दत्तात्रय जमदाडे,भटक्या विमुक्त समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष मच्छिन्द्र भोसले, दिगंबर यादव,अशोक उन्हाळे यांची होती.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

23 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

23 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago