महाराष्ट्राला कोविड लसीचे 19 लाख 50 हजार पुढील दोन दिवसांत मिळणार आहे, अशी माहिती भाजपचे खासदार गिरीष बापट यांनी दिली. मात्र, महाराष्ट्र सरकारने राजकारण न करता लसीचा योग्य वापर करावा, अशी ताकीदही त्यांनी यावेळी दिली.पुण्याहून भाजपचे खासदार गिरीष बापट यांनी आज केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची भेट घेतली. यानंतर नवीन महाराष्ट्र सदनात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्राला किमान आठवडाभर पुरेल एवढा साठा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
दरम्यान, महाराष्ट्रातील उध्दव ठाकरे यांच्या सरकारने आपले अपयश लपविण्यासाठी केंद्र सरकारवर चुकीचे आरोप करू नये. केंद्राकडून लवकरच 19 लाख 50 हजार लसीचा पुरवठा केला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने या लसीचा वापर योग्यरितीने करावा. करोनाचा काळ हा राजकारण करण्यासाठी नाही. सर्वांनी एकत्रित प्रयत्न करून मुकाबला केला पाहिजे. आम्ही सरकारला सहकार्य करीत आहोत. पण लोकांचे लक्ष वाझे प्रकरणावरून वळविण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे, असे ते म्हणाले.बापट म्हणाले, पुण्यात सरासरी दररोज पंचवीस हजार नागरिक लस टोचून घेतात. मात्र, शहराला दर आठवड्याला सुमारे दोन लाख लसीची गरज आहे. लशीचा पुरवठा कमी झाल्याने या मोहिमेवर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील खासगी रुग्णालयांना लस देण्याची परवानगी द्यावी. अशी आमची मागणी आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे यापूर्वीच पाठविण्यात आला आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…