नाशिक, 07 एप्रिल : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सटाणा (satana) साक्री रोडवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNA) एका पदाधिकाऱ्याने स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. कारमध्येच त्यांनी डोक्यात गोळी झाडून जीवनयांत्रा संपवली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सटाणा साक्री रोडवर आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. नंदू ऊर्फ नंदलाल गणपत शिंदे (वय 55) (Nandu ganpat shinde) असं या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. नंदू शिंदे हे मनसेचे पदाधिकारी होते. तसंच ते महिंद्रा अँड महिंद्रामधील युनियनचे माजी पदाधिकारी देखील होते.
नंदू शिंदे हे आपल्या MH 15 FT 0133 क्रमांकाच्या स्कोडा कारने नाशिककडे जात होते. ताहाराबाद रोडवरील यशवंतनगर इथं पोहोचल्यावर त्यांनी गाडी थांबवली. त्यानंतर आपल्या मावस भावाला फोन केला. ‘मी गाडी चालवण्याच्या मनस्थितीत नाही. मी सटाण्याजवळ असलेल्या जोगेश्वरी फर्टिलायझर्स समोर उभा आहे’ असं त्यांनी सांगितले. त्यानंतर मावस भाऊ आणि इतर नातेवाईक हे नंदू शिंदे यांच्याकडे पोहोचले पण तोपर्यंत उशीर झाला होता. समोरच्या सीटवर नंदू शिंदे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.
घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कारच्या समोर सीटवरच नंदू शिंदे यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी एक रिव्हॉल्व्हर जप्त केली आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…