ताज्याघडामोडी

हे तर खंडणी वसूल करणारं सरकार : – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा घणाघात

हे तर खंडणी वसूल करणारं सरकार : – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा घणाघात

माझी जबाबदारी वीज बिल भरायची, माझी जबाबदारी कोरोनामुक्त व्हायची, माझी जबाबदारी सुरक्षित राहायची मग सरकारची जबाबदारी काय? खंडणी वसूल करायची एवढीच का? असा सवाल माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला.

राज्याचे माजी सहकार मंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे नेते हर्षवर्धन पाटील बुधवारी पंढरपूर दौऱ्यावर होते त्यांनी मंगळवेढा पंढरपूर विधानसभा निवडणुकीतील भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षांचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या पंढरपूर तालुक्यातील शिरढोण, वाखरी, कौठाळी, गादेगाव याठिकाणी झालेल्या सभांना ते उपस्थित होते.

राज्यात 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजप-शिवसेना युतीने 163 जागा जिंकल्या, हा कौल युतीच्या बाजूने आणि काँग्रेस-राष्ट्रवादी च्या विरोधात होता पण शिवसेना या दोन पक्षाला जाऊन मिळाला, आणि राज्यात अनैसर्गिक आघाडी झाली, सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करू असे आश्वासन दिले होते, पण आज हेच सरकार वीज कनेक्शन तोडण्याचे काम करत आहे. दिवसाआड एक मंत्री राजीनामा देतोय, उच्च न्यायालय मंत्र्यांची चौकशी करण्याचा आदेश देतंय, अस कधीच घडलं नव्हतं. महाराष्ट्राच्या सत्ता कारणामध्ये, परिवर्तनामध्ये सुरुवात ही पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीपासून होणार आहे, म्हणून भावनिक होऊ नका , ही निवडणूक विकासाची आहे,मंगळवेढा-पंढरपूरचा विकास करायचा असेल तर समाधान आवताडे यांना विजयी करा.

बापानं विठ्ठल बुडवला, दामाजीवर कर्ज केलं, पोरानं अर्जुन बँक बुडवली, झेडपीला पडला, शेतकऱ्यांनो मग अशांना निवडून देणार का?असा प्रश्न रयत क्रांतीचे राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी केला.

पंढरपूर तालुक्यातील शिरढोण या गावात मंगळवेढा पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ मारुती मंदिरासमोर सभा झाली, सभेला आमदार प्रशांत परिचारक, दिनकर मोरे, रयत क्रांतीचे राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले, झेडपी सदस्य वसंतराव देशमुख, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, डॉ बी पी रोंगे, बाळासाहेब देशमुख, पंचायत समिती सभापती अर्चना व्हरगर, उपसभापती भोसले, सदस्या यलमार, बाजार समिती सभापती दिलीप घोडके, दाजी पाटील यांची उपस्थिती होती.

दीपक भोसले म्हणाले, मागील अकरा वर्ष भालके यांनी लबाडीने काम केले, पोरगा पण कमी नाही, बापानं अर्जुन बँक काढून दिली होती, त्याचे शेअर्स घेतले  पण आज बँक कुठे आहे दिसत नाही, बाराला उठायचे टाईमपास करायचा… संपला दिवस, जिल्हा परिषदेला उभारला पण लोकांनी स्वीकारले नाही, पडला आणि आता आमदारकी लढवतोय, बापाच्या वेशात मते मागतोय,सहानुभूती दाखवू नका, विकासाचा दृष्टीकोन ठेवून भाजपने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली, कारखाना चांगला चालवणारा, हजारोंना काम देणाऱ्या आवताडे यांना विजयी करा असे आवाहन केले.या प्रचारदौऱ्यानिमित्त उपस्थित प्रमुख *माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,विधान परिषद आमदार प्रशांत परिचारक,भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख,माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे,रयत क्रांती संघटना महाराष्ट्र कार्याध्यक्ष दीपक भोसले,पांडुरंग कारखान्याचे माजी चेअरमन दिनकर भाऊ मोरे,सभापती अर्चना व्हरगर,उपसभापती राजश्री पंडितराव भोसले,गादेगाव सरपंच ज्योतीताई बाबर, पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे ,जिल्हा परिषद सदस्य,पांडुरंग कारखान्याचे व्हा. चेअरमन वसंतनाना देशमुख, जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब गोसावी,भाजप नेते बी.पी.रोंगे,बाळासाहेब देशमुख,पांडुरंग संचालक सुरेश आगवणे,शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माऊली हळणवर,दाजी पाटील,व त्या त्या गावचे पाटील, सरपंच, चेअरमन व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

ऐतिहासिक यमाई तलाव होणार प्रदूषणमुक्त !

​माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या विशेष प्रयत्नांतून १५ कोटींच्या सिव्हेज पंपिंग स्टेशनचे काम प्रगतीपथावर पंढरपूर:…

4 days ago

यशवंतराव चव्हाण (यमाई) तलावात पाणी सोडण्यास सुरुवात

नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भगीरथ भालके यांच्या मागणीला यश पंढरपूर : उजणी जलाशय पूर्ण क्षमतेने भरलेले…

6 days ago

स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मोफत नेत्र तपासणी शस्त्रक्रिया व आरोग्य तपासणी शिबिर : प्रणव परिचारक

11 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट पर्यंत पंढरपूर तालुक्यात दहा ठिकाणी होणार शिबिर कर्मयोगी श्रद्धेय स्व.…

6 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘प्रोटोटाईप/प्रोसेस डिझाईन अँड डेव्हलपमेंट’ विषयावर कार्यशाळा उत्साहात संपन्न.

पंढरपूर | प्रतिनिधी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर…

6 days ago

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी येथे विद्युत अभियांत्रिकी विभागाचा पालक मेळावा उत्साहात संपन्न

सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर…

1 week ago

भाजी मंडईतील विक्रेत्यांच्या समस्या जाणून घेत नगराध्यक्षा डॉ.प्राणिताताई भालकेयांची प्रत्यक्ष पाहणी.

पंढरपूर : पंढरपूर शहरातील नवी पेठ भाजी मंडई परिसरात आज पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा डॉ.…

1 week ago