कोणाचेतरी कपडे घालून, कुणासारखं दिसलो म्हणून आमदार होता येत नाही –. आ.प्रशांत परिचारक
मंगळवेढा – पंढरपूर तालुक्यातील रांझणी गावात पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्ष, रिपाई आठवले गट,रयत क्रांती संघटना, रासप पक्षाचे अधिकृत उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ भव्य सभा झाली. रांझणी या गावात विराट अशा सभेत आमदार प्रशांत परिचारक यांच्या भाषणाने सर्वांचे लक्ष वेधले. ते म्हणाले, ही निवडणूक विचारांची आहे विरोधक भारत भालके विरोधातील निवडणूक असल्याचा बनाव आणत आहेत मात्र राज्यातील भ्रष्ट सरकार विरुद्ध सामान्य जनता अशी निवडणूक आहे. राजकारणात मीही भावनेवर राजकारण केले असते मात्र मोठ्या मालकांनी सुरू केलेले कारखाने, संस्था या मोठया करायच्या आहेत हीच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरेल.
ही निवडणूक शेतकऱ्यांच्या आक्रोशाची आहे, ३५ गावांना पाणी देतो म्हणून भूलथापा मारल्या, फक्त कागदी घोडे नाचवले, विठ्ठल कारखान्याचे वाटोळे केले, कामगारांना वाऱ्यावर सोडले, आता वारसा सांगून मते मागत आहेत पण मते मिळवण्यासाठी काम करावं लागतं. कुणाची तरी कपडे घातली, कुणासारखं दिसलो म्हणून आमदार होता येत नाही अशी टीका परिचारक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भागिरथ भालके यांच्यावर केली.
आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा निरीक्षक माजी मंत्री बाळासाहेब भेगडे,जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख,. माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख,डॉ बी पी रोंगे, रयत क्रांतीचे दीपक भोसले, शशिकांत चव्हाण, झेडपी सदस्य वसंतराव देशमुख, प्रणव परिचारक, प्रशांत देशमुख, सुनील सर्वगोड, माऊली हळणवर, दिनकर मोरे, अर्चना व्हरगर, सुरेश आगवणे, बाळासाहेब देशमुख, दिलीप घाडगे, हरीश गायकवाड, सुभाष मस्के, भास्कर कसगावडे, भारत मोरे , हरिभाऊ गावंदरे, संतोष देशमुख तुकाराम कुरे ,दादा मोटे, हरिभाऊ फुकारे ,सिताराम भुसे यांच्यासह गावातील सरपंच उपसरपंच विविध संस्थेचे अध्यक्ष पदाधिकारी विकास संस्थेचे चेअरमन ग्रामपंचायत सदस्य भाजपचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भाषणात समाधान आवताडे म्हणाले, विरोधकांच्या टीकेला उत्तर देऊन वेळ घालवण्यापेक्षा गेली अकरा वर्षे मतदार संघ विकासा विना मागे का राहिला का याचा विचार करणे गरजेचे आहे मला मंगळवेढ्याने स्वीकारले आहे मात्र आता पंढरपुरात स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांचा आशीर्वाद आणि आमदार प्रशांत परिचारक यांची साथ यामुळे हत्तीचे बळ आले आहे, ही निवडणूक विकासाची निवडणूक असून कोणत्याही संस्था बुडवायच्या नाहीत त्या कशा चांगल्या चालतील हे पाहणार आहे.आपल्या भाषणात समाधान आवताडे म्हणाले, विरोधकांच्या टीकेला उत्तर देऊन वेळ घालवण्यापेक्षा गेली अकरा वर्षे मतदार संघ विकासा विना मागे का राहिला का याचा विचार करणे गरजेचे आहे मला मंगळवेढ्याने स्वीकारले आहे मात्र आता पंढरपुरात स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांचा आशीर्वाद आणि आमदार प्रशांत परिचारक यांची साथ यामुळे हत्तीचे बळ आले आहे, ही निवडणूक विकासाची निवडणूक असून कोणत्याही संस्था बुडवायच्या नाहीत त्या कशा चांगल्या चालतील हे पाहणार आहे.मला कुठला भ्रष्टाचार करायचा नाही, संस्था बुडवायच्या नाहीत आहे त्या टिकवून रोजगाराच्या संधी उपलब्ध करायच्या आहेत त्यामुळे पायात-पाय न घालता हातात हात घालून पंढरपूर-मंगळवेढ्याचा विकास करू अशी ग्वाही भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी दिली.
भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार मा.श्री.समाधान महादेव आवताडे यांचे प्रचार शुभारंभ ग्रामदैवत श्री.महादेव मंदिर,रांजणी येथुन जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टी जिल्हा प्रभारी,माजी राज्यमंत्री बाळाजी भेगडे,विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, विधान परिषद आमदार मा.श्री.प्रशांत परिचारक,भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, माजी सहकार मंत्री मा.सुभाष देशमुख, पंढरपूर मिस्टर नगराध्यक्ष नागेश भोसले,उपसभापती राजश्री पंडितराव भोसले, रयत क्रांती संघटना महाराष्ट्र कार्याध्यक्ष दीपक भोसले, पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे ,जिल्हा परिषद सदस्य,पांडुरंग कारखान्याचे व्हा. चेअरमन मा.श्री.वसंतनाना देशमुख, भाजप नेते मा.श्री.बी.पी.रोंगे सर,मा.श्री.दत्तात्रय जमदाडे,युवा नेते मा.श्री.प्रणवमालक परिचारक,शेतकरी संघटना अध्यक्ष मा.श्री.माऊली हळणवर,माजी उपसभापती मा.श्री.प्रशांत देशमुख,मा.श्री.सुनील सर्वगोड,पांडुरंग संचालक मा.श्री.सुरेश आगवणे,पंचायत समिती सदस्य मा.श्री.अरुण घोलप,मा.श्री.बाळासो देशमुख,मा.श्री.दिनकर मोरे,संचालक मा.श्री.हरिषदादा गायकवाड, मा.श्री.सुभाष मस्के, मा.श्री.भास्करराव कसगावडे, मा.श्री.भारत मोरे,मा.श्री. हरिभाऊ गावांधरे,जिल्हा परिषद सदस्य मा.श्री.बाळासो देशमुख,मा.श्री.संतोष देशमुख,मा.श्री.तुकाराम कुरे,मा.श्री.हरिभाऊ फुगारे,मा.श्री. सिताराम भुसे,मा.श्री.दादा मोटे,सूत्रसंचालन दिगंबर यादव,अशोक उन्हाळे यांची उपस्थितीत करण्यात आला