शेतकऱ्यांचे शोषण करणारे,जनतेची दिशाभूल करणारे हे सरकार — माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख
भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे मंगळवेढा पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार समाधान आवताडे यांची तावशी या गावात प्रचार सभा झाली या सभेला राज्याचे माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती आमदार देशमुख यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडीच्या सरकारवर सडकून टीका केली. ही निवडणूक फक्त मंगळवेढा पंढरपुर ची नाही तर महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे राज्यातील जनता सरकारवर अक्षता वैतागली आहे, शेतकऱ्यांची वीज तोडू नका म्हणून आम्ही विधान भवनाच्या पायर्यांवर बसून आंदोलन केले त्यामुळे काही दिवस वीज तोडणी बंद केली नंतर पुन्हा अधिवेशन संपल्यावर वीज तोडली, त्यामुळे हे शेतकऱ्याचा शोषण करणारे जनतेची दिशाभूल करणारे सरकार आहे.आपण पाहतोय महिन्याला एक मंत्री राजीनामा देतोय, या सरकारची भूमिका जनतेचे अडचणी सोडवण्याची नाही तर मंत्री व पक्षाची घरे भरण्याची आहे. म्हणून ही निवडणूक महत्वाची आहे.
स्वर्गीय सुधाकरपंत मालकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी समाधान आवताडे यांना निवडून द्या असे सांगत गावागावात आवताडे रुपी सॅनिटायझर मारून कोरोना घेऊन आलेले सरकार घालवा असे आवाहन आमदार प्रशांत परिचारक यांनी केले.
भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार महादेव आवताडे यांचे प्रचार शुभारंभ ग्रामदैवत श्री.महादेव मंदिर,रांजणी येथुन जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टी जिल्हा प्रभारी,माजी राज्यमंत्री बाळाजी भेगडे,विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, विधान परिषद आमदार.प्रशांत परिचारक,भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख,पंढरपूर मिस्टर नगराध्यक्ष नागेश भोसले,उपसभापती राजश्री पंडितराव भोसले, रयत क्रांती संघटना महाराष्ट्र कार्याध्यक्ष दीपक भोसले, पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे ,जिल्हा परिषद सदस्य,पांडुरंग कारखान्याचे व्हा. चेअरमन वसंतनाना देशमुख, भाजप नेते .बी.पी.रोंगे सर,.दत्तात्रय जमदाडे,युवा नेते
प्रणव परिचारक,शेतकरी संघटना अध्यक्ष माऊली हळणवर,माजी उपसभापती प्रशांत देशमुख, .सुनील सर्वगोड,पांडुरंग संचालक सुरेश आगवणे,पंचायत समिती सदस्य अरुण घोलप दिनकर मोरे,संचालक .हरिषदादा गायकवाड, .सुभाष मस्के, भास्करराव कसगावडे, भारत मोरे, हरिभाऊ गावांधरे,जिल्हा परिषद सदस्य.बाळासो देशमुख, संतोष देशमुख, तुकाराम कुरे,.हरिभाऊ फुगारे,. सिताराम भुसे, दादा मोटे,सूत्रसंचालन दिगंबर यादव,अशोक उन्हाळे यांची उपस्थितीत करण्यात आला.