पंढरपूर(प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील विधानसभा पोटनिवडणूकीतील प्रचार सभा कौठाळी, शिरडोण या ठिकाणी सौ.शैलाताई गोडसे यांनी आपली उमेदवारी ही जनतेच्या पाठबळावर दाखल केली आहे. ऊस उत्पादक शेतकरी चे थकीत ऊसबील मिळवून देण्यासाठी, साखळ कारखान्यातील कामगारांचे थकीत पगार मिळवून देण्यासाठी, बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी, महिला भगिनींना सक्षम करण्यासाठी आपण ही निवडणूक लढवीत आहे. लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठी एकवेळ मला संधी द्यावी. असे आवाहन करून शिट्टी च्या चिन्हा पुढील बटन दाबून विजयी करा .असे आवाहन सौ.शैलाताई गोडसे यांनी जनतेला केले.
जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर भैय्या देशमुख आपल्या प्रचार सभेत सौ.शैलाताई गोडसे या जनतेच्या भल्यासाठी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवणाऱ्या एक सक्षम महिला आहेत. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, साखर कामगारांच्या हक्काचे वेतन मिळवून देण्यासाठी धडपणाऱ्या महिला नेत्या आहेत. म्हणून जनहित शेतकरी संघटना सर्व शक्तीने सौ.शैलाताई गोडसेच्या पाठीशी उभी राहिली आहे.
पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील साखर कारखानदारांना वठणीवर आणायचे असेल तर शैलाताई ना निवडून द्या.या साखर कारखानदारांचा भ्रष्टाचार शैलाताई या मस्तवाल कारखानदारांना शिट्टी वाजवून समजून देणार आहे. आणि शिट्टी वाजवून या कारखानदारांना सरळ करणार आहे.भ्रष्ट कारखानदारांचा भ्रष्टाचार शैलाताई गोडसे या शिट्टी वाजवून बाहेर काढणार असा विश्वास प्रभाकर भैय्या देशमुख यांनी जनतेला दिला.
कौठाळी, शिरडोण, वाखरी या गावामधून प्रचार सभेत बोलताना प्रभाकर देशमुख यांनी आपले मत व्यक्त केले. शिट्टी याचिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन जनतेला केले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…