ताज्याघडामोडी

बळीराजा परिवार व समविचारी आघाडीचा भगिरथ भालके यांना पाठिंबा

बळीराजा परिवार व समविचारी आघाडीचा श्री भगिरथ भालके यांना पाठिंबा
मंगळवेढा:
     श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना सुस्थितीत यावा म्हणून बळीराजा परिवार व काही वेगवेगळया पक्षातील समविचारी कार्यकर्ते यांनी सभासदाचे प्रबोधन व्हावे  म्हणून एक मोहिम हाती घेतलेली आहे.त्याचे काम गेले ६ महिने झाले सुरू आहे.साखर कारखान्याचा आर्थिक लेखाजोखा यांची वस्तूस्थिती सभासदासमोर मांडून हा साखर कारखाना कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी बळीराजा परिवार व संबंधित ग्रुप कार्यरत आहे.
     मध्येच पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाची निवडणूक आल्यामुळे या आपल्या आघाडीने कोणाला पाठींबा द्यावा यावर विचार विनिमय करून निर्णय घेण्यासाठी रविवार दिनांक ०४/०४/२०२१ रोजी दुपारी ४ वाजता प्रमुख शेतकऱ्यांची  बैठक बळीराजा पतसंस्थेच्या हाॅलवर घेण्यात आली.त्यामध्ये मोठया प्रमाणावर शेतकरी सभासद हजर होते.या बैठकीमध्ये सर्व शेतकऱ्यांनी एक कमिटी स्थापन करून त्यांनी निर्णय घ्यावा व तो सर्वांनी मान्य करावा असे ठरले. कमिटीमध्ये श्री दामोदर देशमुख,अशोक वाकडे,यादाप्पा माळी,प्रकाश गायकवाड, तुकाराम कुदळे व संजय कट्टे यांची निवड करण्यात आली.या कमिटी सदस्यांनी वेगवेगळया पर्यांयाचा  विचार करून पहावा व आपल्या पुढील कार्यास सकारात्मक दृष्टीकोन ठेवून मदत करणाऱ्या  उमेदवारास पाठींबा द्यावा असा निर्णय या शेतकरी बैठकीत घेण्यात आला व २-३ दिवसात हा निर्णय उपस्थित शेतकऱ्यांना वेगवेगळया माध्यमाद्वारे कळविण्यात यावा असे या बैठकीत ठरले.
      सोमवार दि ५/४/२०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता कमिटीने श्री भगिरथ भालके यांना बोलावून घेतले व दामाजी साखर कारखान्याबाबत शेतकऱ्याच्या असणाऱ्या भावना त्याना अवगत करण्यात आल्या.यावर जवळपास १.३० तास चर्चा होवून उमेदवारानी शेतकऱ्याच्या भल्यासाठी दामाजी साखर कारखान्याच्या निवडणूकीमध्ये आपण सर्वजण मिळून एकत्रीतपणे कर्जाच्या गाळात रूतलेला कारखाना बाहेर काढण्यासाठी सहकार्य करू यावर एकमत झाले.त्यामध्ये बळीराजा परिवाराचे प्रमुख श्री दामोदर देशमुख,व्हा.चेअरमन अशोक वाकडे,श्री संजय कट्टे सर,यादाप्पा माळी,प्रकाशआप्पा गायकवाड, तुकाराम कुदळे भाऊसो,अॅड.भारत पवार,श्री एकनाथ फटे, श्री विठ्ठल गुरूनाथ आसबे,स्विय सहायक रावसाहेब फटे व उमेदवार श्री भगिरथ भालके यांनी सविस्तर प्रत्येक बाबीवर कसा मार्ग काढायचा या विषयी चर्चा केली.सर्व कमिटी सदस्यांनी राष्ट्रवादीचे विधानसभेचे अधिकृत उमेदवार श्री भगिरथ भारत भालके यांना पाठींबा देणेचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर सिंहगडच्या प्लेसमेंटची भरारी; फ्रीस्टीन इन्फोटेकमध्ये चार विद्यार्थ्यांची निवड

संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक ४ लाखांचे पॅकेज पंढरपूर : प्रतिनिधी अत्याधुनिक शिक्षण, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि…

5 days ago

पंढरपूर सिंहगडच्या प्लेसमेंटचा डंका; सानिकाला ९ लाखांचे पॅकेज

कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाची विद्यार्थिनी…

7 days ago

अजितदादांच्या जयंतीनिमित्त अजितदादा सुकन्या योजना राबविणार

लोकनेता पुरस्कार देवून सन्मान करणार - राष्ट्रवादीचे श्रीकांत शिंदे यांचा स्तुत्य उपक्रम लोकनेते तथा महाराष्ट्राचे…

1 week ago

स्थापत्य अभियांत्रिकी विभागात व्हॅल्यू एडिशन प्रोग्राम उत्साहात संपन्न

पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामार्फत…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूटच्या प्रा. बाबर व प्रा. लंबे यांच्या संशोधनाला भारत सरकारचे पेटंट

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पंढरपूर येथील प्राध्यापक डॉ. अनिल बाबर आणि…

2 weeks ago

पंढरपूर सिंहगडच्या दोन विदयार्थ्यांची स्टर्लिंग अँड विल्सन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये निवड वार्षिक ५ लाख पॅकेजची नोकरी

पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनियरींग विभागात चतुर्थ…

2 weeks ago