ताज्याघडामोडी

कृष्णा-भीमा स्थिरीकरण झाल्याशिवाय मंगळवेढ्याचा पाणीप्रश्न सुटणार नाही – आ.रणजितसिंह मोहिते पाटील

कृष्णा-भीमा स्थिरीकरण झाल्याशिवाय मंगळवेढ्याचा पाणीप्रश्न सुटणार नाही – आ.रणजितसिंह मोहिते पाटील 

 मंगळवेढा-   पंढरपूर-मंगळवेढा  विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत येथील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती या गावी विराट अशी सभा झाली या सभेला आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी संबोधित केले आमदार मोहिते-पाटील म्हणाले केवळ मंगळवेढा तालुक्यातच नव्हे तर 31 तालुके आणि सहा जिल्ह्याच्या पाणी प्रश्न जर सोडवायचा असेल तर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या संकल्पनेतून समोर आलेली कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना पूर्ण झाल्याशिवाय हा प्रश्न सुटला जाणार नाही त्यासाठी खंबीर नेतृत्व विधानसभेत पाठवण्याची गरज आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकलूज च्या सभेत  सत्ता येताच केंद्रामध्ये जलसिंचन मंत्रालय स्थापन करू असे आश्वासन दिले, सत्ता आल्यानंतर लगेच त्यांनी ते मंत्रालय सुरू केले त्या मंत्रालयाचे काम सुरू झाले आहे, त्या माध्यमातून ही योजना पूर्ण करायची असून आपल्याकडे पाणी आणायचे आहे त्यासाठीच पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी समाधान आवताडे यांना विजयी करा असे आवाहन केले.        

जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक हे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ  आयोजित प्रचार सभेत बोलत होते. आ. परिचारक म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लॉकडाऊन लॉकडाऊन करत आहेत, त्यांनी हा शब्द वापरला की, शेतीमालाचे भाव पडतात, त्यांचे फक्त माझे कुटुंब, माझी जबाबदारी हेच सुरू आहे, राज्य कसे चालवणार? तीन पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार हे पांढऱ्या पायाचे सरकार असल्याचा आरोप करत त्यांच्या मुळेच महाराष्ट्रात कोरोना आला आणि आज ही परिस्थिती निर्माण झाली. परंतु ही परिस्थिती बदलण्याची वेळ आता आली असून ही निवडणूक राज्यात बदलाची नांदी ठरेल असे परिचारक म्हणाले.     

अडचणीत असलेले राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपला राजीनामा सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंह यांनी केलेल्या आरोपानंतर या प्रकरणाची सीबीआय चौकशी लागली आहे चौकशी सुरू असताना आपण या पदावर राहण उचित होणार नाही म्हणून गृहमंत्री देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेऊन हा राजीनामा दिला आहे या प्रकरणी भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांची प्रतिक्रिया घेतली असता दीड वर्षातच यांचे दोन विकेट पडले आहेत लवकरच महाविकास आघाडी ऑल आउट होईल आणि भाजप पुन्हा सत्तेवर येईल अशी प्रतिक्रिया दिली.

भाजप जिल्हा संघटक शशिकांत चव्हाण सोबत होते, सलगर बुद्रुक गावात झालेल्या सभेत संघटक चव्हाण यांनी पाणीप्रश्नी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवर तोफ डागली. मंगळवेढ्याचा पाणी प्रश्न या निवडणुकीत ही गाजतो आहे, मात्र म्हैसाळ या योजनेसाठी 1995 साली युतीचे सरकार असताना स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी निधी दिला, त्यानंतर 15 वर्ष आघाडीच्या सरकारने दमडा रुपया ही दिला नाही मात्र 2014 साली आलेल्या फडणवीस सरकारने निधी दिला मग काय दिले काँग्रेस राष्ट्रवादीने ? त्यांना पाण्यावर राजकारण करायचे होते त्यांनी केले. 11 वर्ष आमदार असणाऱ्यांनी एक तर योजना आणली का? किती कामे केली? यांना मते मागण्याचा अधिकार आहे का? त्यामुळे विचार करून मतदान करा असे शशिकांत चव्हाण म्हणाले.

रयत क्रांती पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक भोसले हे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ जंगलगी या आयोजित प्रचार सभेत बोलत होते,  2009 ला जर विजयसिंह मोहिते पाटील यांना निवडून दिले असते तर पाण्याचा प्रश्न कधीच सुटला असता, मात्र लबाड, खोटे आश्वासन दिलेल्या माणसाला तुम्ही बळी पडला,  मी पंढरपूर तालुक्यातील सारकोली गावचा सुपुत्र आहे, विठ्ठल कारखाना कधी काळी 40 कोटींच्या ठेवी होत्या पण आता 600 कोटीचे कर्ज भालके यांनी केले, आता पोटनिवडणूक लागली आहे, त्यांच्या पोराला तिकीट दिलंय, बापाच्या वेशात पोरगा फिरत आहे, तुमच्याकडे येईल, मत मागेल तुझ्या बापानं काय केलं तू काय करणार असे सांगून त्याला सारकोलीला परत पाठवा असे आवाहन त्यांनी केले.

आजच्या प्रचारदौरासाठी प्रमुख उपस्थिती आमदार गोपीचंद पडळकर, आमदार प्रशांत परिचारक, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, माजी सभापती प्रदीप खांडेकर, जिल्हा दूध संघ संचालक औदुंबर वाढदेकर, जयंत साळे, जिल्हा भाजपा सरचिटणीस शशिकांत चव्हाण, भगत सर, रयतक्रांतीसंघटनेचे दीपक भोसले,युन्नुस शेख, बाजार समितीचे चेअरमन सोमनाथ आवताडे, कारखान्याचे संचालक सचिन शिवशरण, राजीव बाबर, आझाद दारुवाले, तानाजी जाधव, समाधान हेंबाडे, त्या त्या गावचे सरपंच, चेअरमन, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

3 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

3 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago