शेतकऱ्यांची ऊस बिले,कामगारांचे पगार थकविणाऱ्या चेअरमनवर अंकुश ठेवण्यासाठी मला विधानसभेत पाठवा -शैला गोडसे

पंढरपूर.. मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीतील प्रचार सभा मंगळवेढा तालुक्यातील मुंडेवाडी,रहाटेवाडी, ताम दर्डी गावीआपल्या प्रचार सभेत बोलताना सौ.शैलाताई गोडसे यांनी आपले मनोगत व्यक्त करीत असताना त्या पुढे म्हणाल्या पंढरपूर म़ंगळवेढा मतदारसंघात दोन साखर कारखाने असून प्रत्येक साखर कारखान्याचा चेअरमन हा सभासदांच्या जीवावर स्वःताला.आमदार समजू लागतो.ऊस उत्पादक शेतकरी बांधवाचे ऊसाचे बील थकवणारे,कामगारांचे वेतन बुडवणाऱ्या या साखर कारखान्याच्या चेअरमनांवर अंकुश ठेवण्यासाठी, शेतकरी बंधूंच्या व तसेच कामगार बंधूंच्या उसाचे बिल तसेच थकित वेतन मिळवून देण्यासाठी एक वेळ मला विधानसभेमध्ये जाण्याचे संधीचं जनतेनी द्यावी द्यावी.
मंगळवेढा तालुक्यातील 35 गाव या गावांना पाणी मिळवून देऊ असे म्हणून गेली विधानसभेचे तीन पंचवार्षिक आमदार म्हणून निवडून येणाऱ्या उमेदवाराने अजूनही कित्येक गावांमध्ये पाण्याची सोय केलेली नाही. मंगळवेढा तालुक्यातील काही गावांमधून उमदी या जत तालुक्यातील सांगली जिल्ह्यातील या गावी पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा होऊ शकतो,पाणी दिले जाऊ शकते. परंतु मंगळवेढा तालुक्यातील जनतेला पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. मैसाळ योजनेमध्ये आठ गावांचा समावेश मी शासन दरबारी जिल्हा परिषद सदस्य असताना या आठ गावांचा मी म्हैसाळ प्रकल्प योजनेत समावेश केला. मी आमदार नसताना देखील जनतेसाठी मी अशी विकास कामे करू शकते. परंतु जिल्हा परिषद सदस्य या नात्याने विकास काम करीत असताना काही वेळा मर्यादा येते.विकास कार्याला मर्यादा पडू शकतात. याची जाणीव मला झाल्यामुळे मी विधानसभेमध्ये आमदार होऊन जाण्यासाठी जनतेकडे मी एक वेळ संधी मागत आहे. पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील जनतेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, दोन्ही तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, दोन्ही तालुक्यांचा कायापालट करण्यासाठी, महिला भगिनींना आर्थिक बाबतीत सक्षम करण्यासाठी विविध घरोपोयोगी लघु उद्योग असे छोटे छोटे व्यवसाय सुरू करण्यास मदत करण्यासाठी शासन दरबारी बेरोजगार, शेतकरी, ऊस उत्पादक, कष्टकरी महिला यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वाचा फोडण्यासाठी एक वेळ विधानसभेमध्ये जाण्याची संधी आपण जनतेने द्यावी. असे आवाहन आपल्या प्रचार सभेमध्ये शैलाताई गोडसे यांनी जनतेला केले.
शैला गोडसे यांना ग्रामीण भागांमधून प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे प्रत्येक गावांमधील घरोघरी जाऊन शैलाताई गोडसे या मतदार बंधू-भगिनींना आपली निवडणूक चिन्ह शिट्टी या शिट्टीच्या चिन्हा पुढील बटन दाबून प्रचंड मताने निवडून द्यावे. असे आवाहन सौ. शैलाताई करीत होत्या.सौ. शैलाताई गोडसे यांच्या प्रचार सभे ला प्रचंड गर्दी होत आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

4 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago