महाविकास आघाडी सरकारच्या सत्ताकाळात सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचा उद्योग – आ.प्रशांत परिचारक

२५२ पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्ष, रिपाई आठवले गट,रयत क्रांती संघटना, रासप पक्षाचे अधिकृत उमेदवार मा.श्री.”समाधान महादेव आवताडे” यांच्या प्रचारार्थ मरवडे येथे आमदार श्री प्रशांतराव परिचारक यांच्या सभेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना आमदार प्रशांत परिचारक यांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून या राज्यातील सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडून देत केवळ तिन्ही पक्षाचे नेते आपल्या स्वार्थासाठी सत्ता राबवित असून फडणवीस सरकारच्या काळात सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी,दुर्लक्षित घटकांना न्याय देण्याच्या हेतूने घेण्यात आलेल्या अनेक योजनांना महाविकास आघाडीच्या सत्ता काळात स्थगिती देण्यात आली. तर काही ठिकाणी निधी नाकारण्यात आला.पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही तालुक्याचा परिपूर्ण विकास झाला पाहिजे या हेतूने भाजपच्या झेंड्याखाली एकत्र येत विकासाच्या मुद्द्यावर हि निवडणूक आम्ही लढवत आहोत असे सांगितले.यावेळी उपस्थित जनसमुदायास भाजपच्या कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून निवडून आणण्यासाठी सहकार्य करा आणि भरघोस मतदान करा असं आवाहन त्यांनी केलं.
या प्रचार दौऱ्यानिमित्त उपस्थित प्रमुख माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, आमदार  रणजितसिंह मोहिते, भाजप जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख,रयत क्रांती तालुका अध्यक्ष दीपक भोसले, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष  औदुंबर वाडदेकर,युनूस शेख, शशिकांत चव्हाण,भाजपचे तालुका अध्यक्ष गौरीशंकर बुरकुल, संतोष मोगले आदी उपस्थित होते
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 hour ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago