ताज्याघडामोडी

अभिजित पाटील यांच्या प्रयत्नांमुळे मिळणार तालुक्यातील शेतकऱ्यांना दोन दिवसात पाणी

पंढरपूर प्रतिनिधी:- उजनी कालव्यातून पाणी सोडण्याचे नियोजन वास्तविक १मार्च पासून आवश्यक होते. परंतू सल्लागार बैठक न झाल्याने वीस दिवस उशीरा म्हणजेच २०मार्च पासून पाणी सोडण्यास सुरुवात झाली.मात्र सध्या उन्हाळा मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने व पिके पाण्याअभावी जळून जात असल्याने पिकांना तातडीने पाणी पुरविणे गरजेचे बनले आहे.परंतू सध्या चालू असलेल्या कालव्याच्या पाण्याचा दाब कमी असल्याने टेल टू हेडच्या धोरणानुसार पंढरपूर तालुक्याला पाणी मिळण्यास अजून वीस ते पंचवीस दिवस लागतील अशी शक्यता निर्माण झाल्याने पंढरपूर तालुक्याच्या कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांनी पंढरपूर येथील श्री.अभिजीत पाटील यांची भेट घेऊन त्यांना आपली अडचण सांगितली.

तसेच या बाबतीत मदत व पाठपुरावा करण्याची शेतकऱ्यांनी अभिजीत पाटील यांना विनंती केल्यानंतर पाटलांनी तात्काळ सोलापूर येथील भीमा पाटबंधारे विभागाचे उपमुख्यअभियंता श्री क्षीरसागर यांना भेटून सदर शेतकऱ्यांची अडचण लक्षात आणून दिली.उप मुख्यअभियंता श्री क्षिरसागर यांना पाटील यांनी टेल टू हेड भिजवताना पंढरपूर तालुक्यातील तुंगत, रोपळे, करकंब,भोसे व इतर गावाना सिंचनाला पाणी अजून वीस ते पंचवीस दिवस लागू शकतात यांची माहिती दिली.

तसेच या कालावधी दरम्यान पंढरपूर तालुक्यातील पिके द्राक्षे,डांळिब, कलिंगड, ऊस अशी पिके पंचवीस दिवस पाण्याविना जळून जातील. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते हे निदर्शनास आणून श्री. क्षीरसागर यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी अभिजीत पाटील यांनी केलेल्या प्रयत्नामुळे उपमुख्य अभियंता क्षीरसागर साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद देत येत्या ७ तारखेपासून आपल्या पंढरपूर तालुक्यात पाणी वितरण करण्याचे आश्वासन दिले आहे.यामुळे शेतकऱ्यांनी अभिजीत पाटील यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

7 hours ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

7 hours ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago